Asteroid 2024 YR4 (फोटो सौजन्य - X/@latestinspace)

NASA New Report On Asteroid Hitting Earth: पृथ्वीभोवती लघुग्रहांचा धोका सतत निर्माण होत आहे. नुकत्याच सापडलेल्या एका लघुग्रहामुळे नासा (NASA) मधील शास्त्रज्ञांची झोप उडालीत आहे. या लघुग्रहाचे नाव लघुग्रह Asteroid 2024 YR4 आहे, जो धोकादायक श्रेणीतील लघुग्रह असल्याचे म्हटले जात आहे. नासाच्या अलिकडच्या अहवालात असे म्हटले आहे की, 2032 मध्ये हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता (Asteroid 2024 YR4 Hit Earth 2032) आहे. ला लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची संभाव्यता 1 अशी दिली होती. पण आता एका नवीन अहवालात नासाने दावा केला आहे की, आता धोका जवळजवळ संपला आहे. आता या लघुग्रहाची टक्कर होण्याची शक्यता बरीच कमी झाली आहे.

नासाचा 2024 YR4 लघुग्रहासंदर्भात नवीन अहवाल जारी -

नासाने पुन्हा एकदा लघुग्रह 2024 YR4 बाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. एजन्सीने आता लघुग्रह आदळण्याची शक्यता कमी केली आहे. पूर्वी ते 32 मध्ये 1 होते आणि आता ते 360 मध्ये 1 झाले आहे. या लघुग्रहाचा अंदाजे आकार 55 मीटर असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला, नासाच्या सेंटर फॉर निअर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज (CNEOS) च्या सेंट्री रिस्क टेबलमध्ये ते खूप धोकादायक मानले जात होते. पण नासाने 18 आणि 20 फेब्रुवारी रोजी पुन्हा त्याचे निरीक्षण केले आणि म्हटले की त्याची टक्कर होण्याची शक्यता आता कमी झाली आहे. आता हा लघुग्रह पृथ्वीशी टक्कर न घेता सरळ पुढे जाण्याची शक्यता 99.72 टक्के झाली आहे, जी जवळजवळ नगण्य म्हणता येईल. (हेही वाचा - Planetary Alignment 2025: आकाशात दिसणार ग्रहांची परेड; सर्व 7 ग्रह एका रेषेत येणार, 28 फेब्रुवारीला पाहू शकाल हे दुर्मिळ दृश्य)

2024 YR4 या लघुग्रहाचा धोका पातळी 0 वर

दरम्यान, नासाने जारी केलेले हे निरीक्षण दुर्बिणीच्या आधारित करण्यात आले आहे. लघुग्रहाचा मार्ग आता पूर्वीपेक्षा चांगल्या प्रकारे समजला आहे. टोरिनो स्केलवर त्याचे वर्गीकरण पहिल्या स्तरावर केले जाते. टोरिनो स्केल ही एक प्रणाली आहे जी पृथ्वीजवळील खगोलीय वस्तूंमुळे पृथ्वीला होणाऱ्या नुकसानाचा अंदाज लावते. टोरिनो स्केलचे संस्थापक रिचर्ड बिन्झेल म्हणतात की पुढील निरीक्षणांमुळे 2024 YR4 या लघुग्रहाचा धोका पातळी 0 वर येईल. याचा अर्थ असा की, आता पृथ्वीवरील लोकांना या लघुग्रहाची भीती बाळगण्याची गरज नाही. (हेही वाचा: Surya Grahan 2025: यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कधी? भारतामधून दिसणार का? घ्या जाणून)

2024 YR4 या लघुग्रहानंतर, अवकाशातून येणारा पुढील चिंताजनक धोका म्हणजे 1950 DA नावाचा लघुग्रह. 1950 DA हा लघुग्रह पृथ्वीशी टक्कर घेऊ शकतो. शास्त्रज्ञांच्या मते, ही टक्कर 2880 मध्ये होऊ शकते. त्याची टक्कर होण्याची शक्यता 0.039 % आहे. याआधी, हा लघुग्रह 2028 मध्ये पृथ्वीजवळून जाणार आहे, त्यानंतर शास्त्रज्ञांना त्याचा मार्ग अधिक चांगल्या प्रकारे समजेल.