Shravan 2024: भारतीय संस्कृतीत श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. निसर्ग आणि मानवाचं नातं सातत्याने जपण्याचा प्रयत्न श्रावण महिन्याच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे श्रावण महिन्याला सणांचा महिना देखील म्हटले जाते. हा विविध कार्यक्रमांनी भरगच्च असलेला निसर्गाविषयी कृतज्ञता जाहीर करणारा एक आनंदाचा सोहळा आहे. श्रावण हा महिना भगवान शंकराला (Lord shiva)समर्पित आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी(Shravan Monday)व्रत करुन शिवमूठ वाहिली जाते. जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा भगवान महादेवाने हलाहल विष प्राशन केले. हलाहल विष प्राशन केल्यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवाला जल अर्पण करतात. त्याशिवाय, अभिषेक, पठन, होम-हवन केले जाते. (हेही वाचा:Shravan Somvar 2024 Start and End Dates: जाणून घ्या यंदाचा श्रावण प्रारंभ आणि समाप्ती तारखा; भगवान शिवाला समर्पित पवित्र महिन्याशी संबंधित महत्त्व, परंपरा आणि विधी)
उत्तर प्रदेशातील अनेक राज्यांमध्ये आजपासून हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. तर मराठी पंचांगानुसार महाराष्ट्रात श्रावण मास 5 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तर 3 सप्टेंबरपर्यंत श्रावण महिना असणार आहे.
यंदा श्रावणात एकूण 5 सोमवार
पहिला श्रावण सोमवार - 5 ऑगस्ट 2024
दुसरा श्रावण सोमवार - 12 ऑगस्ट 2024
तिसरा श्रावण सोमवार - 19 ऑगस्ट 2024
चौथा श्रावण सोमवार - 26 ऑगस्ट 2024
पाचवा श्रावण सोमवार - 2 सप्टेंबर 2024
श्रावणात धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा असून महिन्यात विनायक चतुर्थी, नागपंचमी, शितला सप्तमी, दुर्गाष्टमी, पुत्रदा एकादशी, नारळी पौर्णिमा, संकष्ट चतुर्थी, कालाष्टमी, अजा एकादशी, शनिप्रदोष व्रत, मासिक शिवरात्री असे महत्त्वाचे सण उत्सव असतात.