Vat Purnima 2024 Date: सनातन धर्मात वट सावित्री व्रत (Vat Savitri Vrat 2024) अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. वैदिक दिनदर्शिकेनुसार, हे व्रत दरवर्षी अमावस्या आणि ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या विशेष दिवशी भगवान विष्णू आणि वटवृक्षाची पूजा केल्याने विशेष लाभ होतो. तसेच या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबात समृद्धीसाठी हे व्रत करतात. वट सावित्री पौर्णिमा केव्हा आहे? व्रत आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या.
वट सावित्री पौर्णिमा 2024 तारीख -
वैदिक कॅलेंडरनुसार, ज्येष्ठ शुक्ल पक्षाची पौर्णिमा 21 जून रोजी सकाळी 07:31 वाजता सुरू होईल आणि ही तिथी 22 जून रोजी सकाळी 06:37 वाजता समाप्त होईल. वट सावित्रीची पूजा अभिजीत मुहूर्तावर केली जाते. त्यामुळे शुक्रवार 21 जून 2024 रोजी वटसावित्रीचे व्रत पाळण्यात येणार आहे. याशिवाय ज्येष्ठ पौर्णिमा व्रतही या दिवशी पाळण्यात येणार आहे. या दिवशी शुभ आणि शुक्ल योग तयार होत असल्याचे पंचांगात सांगितले आहे. शुभ योग संध्याकाळी 06:40 पर्यंत राहील आणि त्यानंतर शुक्ल योग सुरू होईल. (वाचा - International Yoga Day 2024: पंतप्रधान मोदी यांच्याकडून उष्ट्रासन योग आसनाचा व्हिडीओ शेअर; शारिरीक जडणघडणीत योगाचे महत्त्व केले अधोरेखीत)
वट सावित्री पौर्णिमेच्या व्रताचे महत्त्व -
वट सावित्री व्रत मुख्यतः महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारतात ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते. तर उत्तर भारतात हा व्रत अमावस्येच्या दिवशी विधीपूर्वक पाळला जातो. दोन्ही व्रतांचे परिणाम सारखेच असतात. वट सावित्री व्रताच्या दिवशी उपासना केल्यास जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते, असे मानले जाते.
दिवशी महिला वटवृक्षाची पूजा करतात. त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश वटवृक्षात राहतात, असेही मानले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात वटवृक्ष अत्यंत पूजनीय मानले जाते.