Photo Credit - Wikimedia

करवा चौथचा सण येत आहे. हिंदू धर्मात या उत्सवाला लग्न झाले्या महिलांसाठी विशेष महत्त्व आहे.करवा चौथ दिवाळीच्या 10 किंवा 11 दिवस आधी साजरा केला जातो. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला उपवास ठेवतात. या दिवशी चंद्राला खुप महत्व असते. संध्याकाळी चंद्राची पूजा करून हा उपवास सोडला जातो.जाणून घेऊयात यंदा करवा चौथ कधी आहे? मुहूर्त वेळ कोणती आणि पूजा पद्धत.(Papankusha Ekadashi 2020 : पापांकुशा एकादशीचे व्रत केल्यास मृत्यूची भीती दूर होऊन मिळतो मोक्ष ;जाणून घ्या पद्धत आणि महत्त्व)

या वर्षी करवा चौथ कधी आहे?

या वर्षी 4 नोव्हेंबर रोजी करवा चौथ  व्रत केले जाईल.

करवा चौथ पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे

४ नोव्हेंबर रोजी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी सकाळी 3 वाजून 24 मिनिटांनी प्रारंभ होत आहे. चतुर्थी तिथि सकाळी ५ वाजून १४ मिनिटांनी समाप्त होईल. 4 नोव्हेंबर रोजी करवा चौथ पुजेचा  शुभ मुहूर्त संध्याकाळ 5 वाजून 34 मिनिटांपासून ते संध्याकाळी 6 वाजून 52 मिनिटांपर्यंत पर्यंत आहे. या दरम्यान आपण पूजा करावी.

करवा चौथ च्या दिवशी चंद्रोदयाची वेळ 

या दिवशी चंद्राला खुप महत्व असते.उपवास ठेवणाऱ्या महिला या दिवशी चंद्राला पाणी दिल्यानंतरच जोडीदाराच्या हातातून पाणी पितात. 4 नोव्हेंबर रोजी चंद्रोदयाची  संध्याकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी आहे.

करवा चौथ पूजा पद्धत

हे व्रत सूर्योदय च्या आधी आणि चंद्रोदय करुन ठेवले जाते. चंद्र दर्शनानंतरच उपवास सोडला जातो.संपूर्ण शिव कुटुंब, शिव जी, माँ पार्वती, नंदी जी, गणेश जी आणि कार्तिकेय जी चंद्रोदयापूर्वी पूजा केली जातात. पूजेच्या वेळी पूर्वेकडे तोंड करून बसावे .चंद्राची पूजा केल्यानंतर चाळणीतून आपल्या पतीला पाहावे. आणि त्यानंतर पतीच्या हाताने पाणी प्यावे त्यानंतरच व्रत सोडले जाते.