पितृ पक्ष (Photo Credit: Wikimedia Commons)

Pitru Paksha 2022 Dates: हिंदू धर्मात महालयारंभ पितृ पक्षाला (Pitru Paksha) खूप महत्त्व आहे. पितृपक्षात पितरांना नमस्कार करणे शुभ मानले जाते. पंचांगानुसार, पितृ पक्षाची सुरुवात भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून होते आणि अश्विन महिन्याच्या अमावास्येला समाप्त होते. असे मानले जाते की, पितृ पक्षादरम्यान, पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात.

पितृ पक्ष कधी सुरू होत आहे?

हिंदू कॅलेंडरनुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा शुक्रवार, 09 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 06.07 पासून सुरू होत आहे. यासह, भाद्रपद पौर्णिमा तिथी शनिवारी, 10 सप्टेंबर रोजी दुपारी 03:28 वाजता समाप्त होईल. त्यामुळे यंदा भाद्रपद पौर्णिमा 10 सप्टेंबरला असेल. या दिवसापासून श्राद्धही सुरू होईल. (हेही वाचा - Teacher's Day 2022: शिक्षक दिन कधी आहे? हा दिवस का साजरा केला जातो? त्यामागचा इतिहास काय आहे? वाचा सविस्तर)

पिंडांचे दान केल्याने पित्रांना मिळतो मोक्ष -

असे मानले जाते की, पितृ पक्षाच्या काळात पिंड दान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो. तसेच पिंड दान केल्याने कुंडलीतून पितृदोषापासून मुक्ती मिळते.

पितृ पक्ष 2022 च्या प्रमुख तारखा -

10 सप्टेंबर 2022 - पौर्णिमा श्राद्ध भाद्रपद, शुक्ल पौर्णिमा

11 सप्टेंबर 2022- कृष्ण प्रतिपदा तिथीला अश्विन, प्रतिपदा श्राद्ध

12 सप्टेंबर 2022 - अश्विन महिन्याची कृष्ण द्वितीया

13 सप्टेंबर 2022 - अश्विन महिन्याची कृष्ण तृतीया

14 सप्टेंबर 2022 - अश्विन महिन्याची कृष्ण चतुर्थी

15 सप्टेंबर 2022 - अश्विन महिन्याची कृष्ण पंचमी

16 सप्टेंबर 2022 - अश्विन, कृष्ण षष्ठी

17 सप्टेंबर 2022 - अश्विन, कृष्ण सप्तमी

18 सप्टेंबर 2022 - अश्विन, कृष्ण अष्टमी

19 सप्टेंबर 2022 - अश्विन, कृष्ण नवमी

20 सप्टेंबर 2022 - अश्विन, कृष्ण दशमी

21 सप्टेंबर 2022 - अश्विन, कृष्ण एकादशी

22 सप्टेंबर 2022 - अश्विन, कृष्ण द्वादशी

23 सप्टेंबर 2022 - अश्विन, कृष्ण त्रयोदशी

24 सप्टेंबर 2022 - अश्विन, कृष्ण चतुर्दशी

25 सप्टेंबर 2022 - अश्विन महिन्याची कृष्ण अमावस्या तिथी, सर्वपित्री अमावस्या

डिसक्लेमर -

या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/साहित्य/गणनेच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/श्रद्धा/शास्त्रातून गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमचा उद्देश केवळ माहिती प्रसारित करणे हा आहे, वापरकर्त्यांनी ती केवळ माहिती म्हणून घ्यावी. याव्यतिरिक्त, वापरकर्ता स्वत: त्याच्या कोणत्याही वापरासाठी जबाबदार असेल.