आचार्य विनोबा भावे यांची आज जयंती (Vinoba Bhave Birth Anniversary). विनोबा भावे (Vinoba Bhave) यांच्या जयंती निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), उप-राष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिवादन केले आहे. विनोभा भावे यांचे पूर्ण नाव विनायक नरहरी भावे असे होते. मात्र, आपल्या कार्यामुळे ते आचार्य विनोबा भावे नावाने प्रसिद्ध झाले. 11 सप्टेंबर 1885 रोजी त्यांचा जन्म झाला. ते भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे आणि भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधी यांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. महात्मा गांधी यांनी 1940 मध्ये पुकारलेल्या 'वैयक्तिक सत्याग्रह' लढ्यात आचार्य विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते. 'भारत छोडो' आंदोलनातही विनोबा भावे अग्रेसर होते.
आचार्य विनोबा भावे यांना मान्यवरांकडून आदरांजली
Mahatma Gandhi described him as someone who was absolutely against untouchability, unwavering in his commitment to India’s freedom and a firm believer in non-violence as well as constructive work. He was a thinker par excellence.
Tributes to Acharya Vinoba Bhave on his Jayanti. pic.twitter.com/SEDDY1oo0A
— Narendra Modi (@narendramodi) September 11, 2021
ट्विट
Acharya Vinoba Bhave personified the Gandhian ideals of Sarvodaya, sacrifice & service. His Bhoodan & Gramdaan movements demonstrated that positive and lasting changes are possible with people’s active participation.
My tributes to the great son of our motherland on his Jayanti.
— Vice President of India (@VPSecretariat) September 11, 2021
ट्विट
सर्वोदयी विचारांचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अभिवादन केले. भूदान चळवळीतून प्रबोधन करणारे तत्त्वचिंतक, व्रतस्थ अशा भारतमातेच्या महान सुपुत्राला, आचार्य विनोबा भावे यांना विनम्र अभिवादन, असे मुख्यमंत्री म्हणाले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 11, 2021
ट्विट
आचार्य विनोबा भावे हे निरपवाद अहिंसेच्या तत्वाचे सच्चे पाईक होते. विनोबांनी सत्य, अहिंसा व सर्वधर्मसमभावावर आधारलेला सर्वोदयाचा मार्ग सांगितला. समाजामध्ये महात्मा गांधीजींची तत्वे पुन्हा अधिष्ठित करण्याचे काम केले. भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. pic.twitter.com/DEwH1TLREU
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 11, 2021
विनोबा भावे यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. आपल्या सामाजिक कार्यासोबतच त्यांनी विपूल लेखणही केले. , अष्टादशी (सार्थ), ईशावास्यवृत्ति, उपनिषदांचा अभ्यास, गीताई, गीताई-चिंतनिका, गीता प्रवचने, गुरुबोध सार (सार्थ), जीवनदृष्टी, भागवत धर्म-सार, मधुकर, मनुशासनम् (निवडक मनुस्मृती - मराठी), लोकनीती, विचार पोथी, साम्यसूत्र वृत्ति, साम्यसूत्रे, स्थितप्रज्ञ-दर्शन ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.