Veer Savarkar Death Anniversary (Photo Credits: savarkar.org)

Veer Savarkar Marathi Quotes : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रखर हिंदुत्ववादी नाव म्हणजे विनायक दामोदर सावरकर, देशप्रेमासाठी ज्यांनी 10 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, इंग्रजांच्या जुलमी तावडीतून हुशारीने सुटून येत अवघा समुद्र पोहून पार केला, अशा या महान पुढार्यांचा 26 फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी मृत्यू झाला. स्वातंत्र्य आणि हिंदुत्व सत्यात उतरवल्यावर 1 फेब्रुवारी 1966 अन्न पाणी औषधे सोडून देत त्यांनी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.आणि 26 दिवसांनी अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. सावरकरांचा मृत्यू ही दुःखद घटना असली तरी त्यांनी डोळे मिटण्याआधी आयुष्यातील सर्व ध्येय पूर्ण करून मग आपला आत्मत्याग करण्याचे समाधान मिळवले होते. वीर सावरकर हे स्वातंत्र्यसेनानी सोबतच लेखक, तत्त्वज्ञ, भाषाकार होते. एका उत्तम भाषातज्ञांप्रमाचे सावरकरांच्या शब्दाला वजन होते, त्यामागे प्रेरणा होती, जी आज इतक्या वर्षानंतरही कुण्याही व्यक्तीला देशप्रेमाने भारावून टाकू शकते, आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सावरकरांचे असेच काही विचार जाणून घेणार आहोत. वीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घ्या त्यांच्या मृत्यूचे खरे कारण

सावरकरांचे हे विचार तुम्हाला तुमच्या मित्रपरिवार, नातेवाईक किंवा अन्य मंडळींसह शेअर करता यावेत याचीही सोय आम्ही केलेली आहे, त्यासाठी खाली देण्यात आलेल्या Images डाउनलोड करून तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप(WhatsApp), मेसेंजर (Messenger) ,फेसबुक (Facebook) किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करू शकता.

उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही.

-वीर सावरकर

Veer Savarkar Quotes In Marathi (Photo Credits: File Image)

आपल्या प्रामाणिक पणाचा उपयोग होईल पण केव्हा ? तर दुसऱ्यास प्रामाणिक बनवण्याइतका आपला प्रामाणिकपणा बलवान असेल तेव्हाच!

-  वीर सावरकर

Veer Savarkar Quotes In Marathi (Photo Credits: File Image)

आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्यामागे  कुणी येवो ना येवो. जे आपल्याला करावस् वाटत ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे.

-  वीर सावरकर

Veer Savarkar Quotes In Marathi (Photo Credits: File Image)

अनेक फुले फूलती । फुलोनिया सुकोन जाती ।।

कोणी त्यांची महती गणती ठेविली असे ।।

मात्र अमर होय ती वंशलता । निर्वंश जिचा देशाकरिता ।।

-  वीर सावरकर

Veer Savarkar Quotes In Marathi (Photo Credits: File Image)

देहाकडुन देवाकडे जाताना देश लागतो

आणि या देशाचे आपण देणे लागतो

-वीर सावरकर

Veer Savarkar Quotes In Marathi (Photo Credits: File Image)

विनायक दामोदर सावरकर यांचे नाव मागील काही काळात देशाच्या राजकारणात सतत चर्चेत आहे. एकीकडे काही राजकीय पक्षांकडून सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी होत असताना दुसरीकडे काहींकडून सतत लांच्छने लावण्यात येत आहेत, मात्र हे कितीही वाद असले तरी भारताच्या स्वतंत्र्यात सावरकर यांचे योगदान तर सर्वांनाच मान्य करावे लागेल असे आहे. भारतमातेच्या या थोर पुत्राला आज पुण्यतिथीच्या निमित्ताने लेटेस्टली परिवाराकडुन विनम्र अभिवादन!