
Vat Purnima 2023 HD Images: विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच सात जन्म हाच पती मिळावा म्हणून दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्रीचे व्रत (Vat Purnima 2023) करतात. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी निर्जला व्रत करतात, तसेच वडाच्या झाडाची पूजा करून पतीसाठी प्रार्थना करतात. वट सावित्रीचे व्रत करवा चौथसारखे फलदायी मानले जाते. विवाहित महिलांसाठी वट सावित्री व्रताच्या दिवसाला सणाप्रमाणे विशेष महत्त्व आहे. हे व्रत स्त्रीत्वाचे प्रतीक मानले जाते. महाराष्ट्रात यंदा शनिवार 3 जून रोजी वट पौर्णिमा साजरी होत आहे.
वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला आणि त्याचा पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सावित्रीने पती सत्यवानला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली तपश्चर्या केली होती व याच झाडाखाली तिने यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले, त्यामुळे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात.
तर या आजच्या दिवसाचे औचित्य साधत तुम्ही खास Images, Whatsapp Status, Wishes, Quotes, Greetings, Messages शेअर करून वट पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकता.





दरम्यान, वटसावित्रीचे व्रत हे तीन दिवसीय व्रत असते. ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस व्रत करणे शक्य नाही, त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आचरावे, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. (हेही वाचा: वट सावित्री व्रताची कथा, पूजाविधी आणि महत्त्व जाणून घ्या)
या दिवशी स्त्रिया वटवृक्षाला तांदूळ, फुले आणि पाणी अर्पण करतात. त्याची पूजा करतात व नंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालत त्याला धागा बांधतात. पूजेनंतर महिला एकमेकींना आंब्याचे वाण देतात.