Marathi Ukhane: ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा हा सण महाराष्ट्रामध्ये सुवासिनी महिला वटपौर्णिमा (Vat Purnima) म्हणून साजरी करतात. यंदा 16 जून (रविवार) दिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. त्याच्या आधी तीन दिवसांपासून महिला वटसावित्रीचे व्रत आणि उपवास करण्यास सुरूवात करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून हे व्रत पूर्ण केलं जातं. नववधूंसाठी लग्नानंतर येणारी पहिली वटपौर्णिमा विशेष असते. पूजा विधी दरम्यान या पूजेत एक आकर्षणाचा असणारा एक भाग म्हणजे उखाणा. मग यंदा ऐनवेळी पंचाईत होऊ नये म्हणून हे काही वटपौर्णिमा विशेष उखाणे लक्षात ठेवून बाहेर पडा. वटसावित्री व्रतारंभ ते वटपौर्णिमा पूजा करण्याचा यंदाचा शुभ मुहूर्त काय?
वटपौर्णिमा 2019 विशेष उखाणे
- दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
.........चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी
- नाजूक अनारसे साजूक तुपात तळावेत,
...... सारखे पती जन्मोजन्मी मिळावेत
- संसाराच्या देव्हा-यात उजळतो नंदादीप समाधानाचा
----- रावांचे नाव घेऊन, मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा
- अंलकारात अंलकार मंगळसूत्र मुख्य
----- रावांचा आनंद हेच माझे सौख्य
- सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह
----- रावांचे नाव घेण्यास नको मला आग्रह
- पौर्णिमेच्या दिवशी चंद्र निघाला गगनात
----- रावांचे नाव घेते ----- च्या अंगणात
- जीवनाला सुगंध असावा चंदनाचा
---------- चे नाव घेताना धागा जोडला प्रेमाच्या बंधनाचा
- मान राखून तुमचा, मैत्रिणींनो घेते मी उखानापण ……………… रावांचं नाव घ्यायला लागतो मला बाई बहाणा
- सागर तेथे सरिता कवी तेथे कविता------------ रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता
- कर्ता करविता परमेश्वर त्यावर टाकते मी भार
------- रावांचे नाव घेते कर देवा संसार नौका पार
- कळत नाही माझेच मला आहे स्वप्न कि भास
------- रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास
- टपोरा मोगरा फुलला छान------- रावांचे नाव घेऊन राखते सर्वाचा मान
- पौर्णिमेच्या चंद्राची उज्जवल प्रभा------- राव हेच माझ्या सौभाग्याची शोभा
वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश व्हिडिओ
वटपौर्णिमा सणादिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी प्रार्थना करतात.