Vat Purnima 2019 Vrat Date: वटसावित्री व्रतारंभ ते वटपौर्णिमा पूजा करण्याचा यंदाचा शुभ मुहूर्त काय?
Vat Purnima 2019 (File Photo)

पतीच्या दीर्घायुष्यासाठी भारतीय स्त्रिया वटसावित्रीचं व्रत (Vat Savitri Vrat) करतात. ज्येष्ठ पौर्णिमा (Jyeshtha Purnima) म्हणजेच वटपौर्णिमा ( Vat Purnima) हा सण विवाहित स्त्रियांसाठी मोठा महत्त्वाचा आहे. यंदा 16 जून 2019, रविवार या दिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाणार केली जाणार आहे. पारंपारिक पद्धतीनुसार ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीपासून तीन दिवस उपवास ठेवून वट सावित्रीचं व्रत केलं जातं. मात्र आजकाल अनेक स्त्रिया घर, संसार आणि करियर यांच्यमध्ये कसरत करत असल्याने केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास, वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना करतात. वटपौर्णिमा दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडालाच का दोरा गुंडाळतात? जाणून घ्या कारण

वटपौर्णिमा 2019 व्रत तारीख, वेळ आणि मुहूर्त

वट सावित्री व्रत आरंभ- शुक्रवार, 14 जून 2019

वटपौर्णिमा - रविवार,16 जून 2019

वडाची पूजा करण्याची वेळ - रविवारी (16 जून) पौर्णिमा दुपारी 2 वाजून 03 वाजल्यापासून सुरू होत आहे. तर ही पौर्णिमा सोमवार (17 जून) दुपारी 2 वाजता संपणार आहे.

(नक्की वाचा: वट सावित्री व्रताची सांगता करताना हमखास होणारा आग्रह पूर्ण करण्यासाठी खास वटपौर्णिमा विशेष उखाणे)

वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश व्हिडिओ

वटपौर्णिमेदिवशी वडाच्य झाडाची पूजा करताना वाण, हळदी कुंकू, 5 फळांचा नैवैद्य दाखवला जातो. सोबतच वडाला धागा बांधून सात फेर्‍या मारल्या जातात. पुढील सातही जन्म हाच पती मिळावा म्हणून, पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते.