
Tulsi Vivah Wishes in Marathi: हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला (Tulsi) मांगल्याचे प्रतिक मानले आहे. ज्या घरासमोर तुळस असते तिथे सुख, शांती, समाधान नांदते असे म्हटले जाते. दिवाळी हा हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण, या सणाची सांगता होते ते तुळशीच्या विवाहाने (Tulsi Vivah 2021). यंदा 15 नोव्हेंबरला तुळशीचा विवाह होणार आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. या दिवशी तुळस वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह लावला जातो. तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते.
कार्तिक महिन्यात उपासना, दान-धर्म यांना विशेष महत्त्व आहे. या महिन्यात तुळशीची पूजा करून तुळशी विवाहाचे आयोजन केल्याने कन्यादानाचे फळ मिळते आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते, असे म्हणतात. यंदा तुम्ही आपल्या मित्र-परिवाराला तुळशी विवाहानिमित्त मराठी ग्रीटिंग्स, SMS, Messages, Whatsapp Status, Wishes, Images च्या माध्यमातून शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्हाला खालील तुळशी विवाहाचे संदेश नक्की उपयोगात येतील.





(हेही वाचा: तुळशीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका WhatsApp Messages, Images द्वारा शेअर करत द्या विवाहसोहळ्याचं आमंत्रण)
दरम्यान, तुळशी विवाहादिवशी दाराला तोरण लावावे, छोटा मंडप घालावा. संध्याकाळी मुहूर्तावर आधी गणपती-मातृका पूजा करावी. त्यानंतर लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुळशीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवा. गोरज मुहूर्तावर (वराचे) देवाचे पूजन करावे. मंत्रोच्चारासहित कन्येस (तुळशीस) दान करावे. त्यानंतर अंतरपाठ धरून मंगलाष्टका म्हणावी व सप्तपदी पूर्ण करावी. मग स्वत: अन्न ग्रहण करून तुळशी विवाहाचे व्रत सोडावे.