
Tulsi Vivah 2021 Invitation Marathi Messages Format: दिवाळीच्या धामधुमीनंतर सर्वत्र उत्साह असतो तो म्हणजे तुळशीच्या लग्नाचा(Tulsi Vivah) . चातुर्मास (Chaturmas) संपल्यानंतर पुन्हा शुभ कार्यांची सुरूवात करताना पहिला तुलसीविवाह पार पडतो. कार्तिकी एकादशी नंतर बारशी अर्थात कार्तिक द्वादशी पासून तुळशीची लग्न सुरू होतात. यंदा 15 नोव्हेंबर पासून 19 नोव्हेंबर पर्यंत तुळशीची लग्न पार पडणार आहेत. यंदा कोविड 19 चं संकट सणाच्या धामधुमीत थोडं नियंत्रणामध्ये असल्याने अनेक जण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. मग तुमच्या घरी देखील यावर्षी धुमधडाक्यात करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्या नातेवाईकांना, प्रियजणांना देखील त्यामध्ये सहभागी करून घ्या. या तुळशीच्या लग्नाचंदेखील आमंत्रण असतं. थोड्या हटके अंदाजात तुमच्या घरातील तुलसीविवाह सोहळ्याचं आमंत्रण व्हॉट्सअॅप स्टेट्स, मेसेजेसच्या (WhatsApp Messages) माध्यमातून देऊन नातेवाईकांना, आप्टेष्टांना आमंत्रण देण्यासाठी या निमंत्रणपत्रिका नक्की शेअर करा आणि तुळशीच्या लग्नाच्या सोहळ्याचं सेलिब्रेशन करा.
तुळशीच्या लग्नाला लक्ष्मीच्या रूपातील 'तुळस' आणि विष्णूच्या रूपातील 'शाळीग्राम' याचा विवाह सोहळा पार पाडला जातो एका सामान्य लग्नसोहळ्याप्रमाणेच तुळशीचा विवाह पार पडतो. मग त्याची तयारी देखील तशीच व्हायला पाहिजे.
तुळशीच्या लग्न सोहळ्याची आमंत्रणपत्रिका
नमुना 1
शुभ विवाह आमंत्रण
आज आमच्या तुळशीच्या लग्नाला यायच हं...
वेळ - संध्याकाळी 7.10 वाजता
लग्न आमच्या दारात आणि जेवणाची सोय तुमच्या घरात !

नमुना 2:
॥ तुळशीविवाह ॥
चि. विष्णू आणि चि.सौ.का. तुळशी
यांचा विवाहसोहळा आमच्या घरी शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2021 दिवशी आयोजित केला आहे. सायंकाळी 7 वाजण्याच्या शुभमुहूर्तावर पार पडणार आहे.
विवाहस्थळ: तुळशी वृंदावन
आमच्या तुळशीच्या लग्नाला यायच हं!
नमुना 3:
सॉरी Friends,
I Am Very सॉरी..!!
लग्न इतक्या गडबडीत ठरलं,
आणि लग्नाची तारीख पण खुपच लवकर काढली..!!
त्यामुळे सगळं जमवायला वेळ ही खुप कमी मिळालाय,
ह्या लग्नाच्या धावपळीत तुमच्या पर्यंत
पत्रिका पोहचो न पोहचो तरी
हेच निमंत्रण समजुन तुम्ही या..
लग्नाची तारीख 19-11-2019 आहे, संध्याकाळीः 7.20 वा..
.
.
.
.
आमच्या तुळशीच्या लग्नाला यायचं हं!
तुळशीचं लग्न लावणार्या व्यक्तीला या व्रताच्या माध्यमातून कन्यादान केल्याचं पुण्य मिळतं. अशी धारणा आहे. तसेच काहींच्या धारणेनुसार तुळशी विवाहाच्या व्रतामुळे घरातील कन्येला कृष्णाप्रमाणे वर मिळण्यास मदत होते.