Tulsi Vivah 2020 Rangoli Designs: तुळशी विवाहाचा सण खास बनवण्यासाठी 'या' सोप्प्या सुंदर, आकर्षक पद्धतीच्या रांगोळ्या दारासमोर काढा (Watch Video)
तुळशी विवाह रांगोळी (Photo Credits-Youtube)

Tulsi Vivah 2020 Rangoli Designs: उत्तर भारतासह देशातील बहुतांश ठिकाणी 26 नोव्हेंबरला तुळशी विवाह साजरा केला जाणार आहे. या दिवशी घरातील तुळशीला सजवत मंगलाष्टका म्हणत लग्न लावले जाते. भारतीय संस्कृतीत तुळशीच्या झाडाला फार महत्व आहे. तुळशीचे झाड घरात असणे हे शुभ मानले जाते. लग्नसोहळा असो किंवा एखादे शुभ कार्य त्यावेळी सुद्धा तुळशीपत्रांचा वापर केला जातो. तुळशीविवाहाचा सोहळा एकूणच पारंपरिक लग्नसोहळ्या सारखा पार पाडला जातो. जेथे वधू म्हणून तुळस आणि वर म्हणजे शालिग्रामच्या रुपातील भगवान विष्णू.(Tulsi Vivah 2020 Marathi Invitation Card: तुलसी विवाह आमंत्रण WhatsApp Messages, Images द्वारा शेअर करत आप्तेष्टांना द्या तुळशीच्या लग्नाचं निमंत्रण)

तुळशी विवाहाच्या दिवशी महिला व्रत ठेवण्यासह संपूर्ण घर सजवतात. तसेच तुळशीवृंदावन उसाच्या चार खाबांनी सजवले जाते. हिरव्या आणि लाल बांगड्या सुद्धा अर्पण केल्या जातात. ऐवढेच नाही तर तुळशी विवाहनिमित्त खास रांगोळ्या सुद्धा काढल्या जातात. त्यामुळेच यंदाच्या तुळशी विवाह  खास बनवण्यासाठी 'या' सोप्प्या सुंदर, आकर्षक पद्धतीच्या रांगोळ्या दारासमोर काढा.(Tulsi Vivah 2020 Wishes in Marathi: तुळशी विवाहा च्या शुभेच्छा Greetings, Messages द्वारे देऊन आनंदात साजरा करा हा उत्सव!)

येथे पहा व्हिडिओ:

तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी वृंदावनाच्या येथे आकर्षक रांगोळ्या काढल्या जातात. पौराणिक मान्यतेनुसार, देवउठनी एकादशीला भगवान विष्णू चार महिन्याच्या निद्रावस्थेतून जागे होतात. त्यानंतरच या दिवसापासून शुभ कार्यांना सुरुवात होते. काही ठिकाणी देवउठनी एकादशीच्या दिवशी अन्य काही भागात त्याच्या दुसऱ्या दिवशी तुळस-शालिग्रामचा विवाह केला जातो.