
Tulsi Vivah 2020 Invitation Marathi Messages Format: भारतामध्ये दिवाळीचा सण झाल्यानंतर सार्यांनाच वेध लागतात ते म्हणजे तुळशीच्या लगनाचे! यंदा तुलसी विवाह सोहळा 26 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे तर 30 नोव्हेंबर पर्यंत तो साजरा करता येईल. हिंदू धर्मीयांसाठी तुळस ही अगदी पवित्र वनस्पती मानली जाते. त्यामुळे लक्ष्मीच्या रूपातील तुळस आणि भगवान विष्णूच्या रूपातील शाळीग्राम यांचा विवाह सोहळा कार्तिक शुक्ल एकादशी पासून सुरू होतो. घरोघरी या लग्नाची मोठी धामधूम असते. मग तुमच्या घरी देखील मोठ्या स्वरूपात तुळसीचं लग्न लावलं जात असेल तर त्याच आमंत्रण नातेवाईकांना, आप्तेष्टांना, मित्र मंडळींना पोहचलंच पाहिजे. पण यंदा तुलसी विवाह सोहळ्याच्या धामधूमीवर कोरोनाच संकट आहे. त्यामुळे अनेकांना यंदा ऑनलाईन सोहळ्यातूनच तुमच्या घरगुती तुळशी विवाहाच्या सोहळ्यात सहभागी करून घ्या. यासाठी तुलसी विवाह आमंत्रण पत्रिका आणि ऑनलाईन सोहळ्याची लिंक तुम्ही व्हॉट्सअॅप, फेसवूक मेसेजेसच्या माध्यमातून आजच शेअर करा. Tulsi Vivah Mangalashtak: तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टकं, लग्नगीतं,आरती गाऊन धूमधडाक्यात साजरा करा तुलसीविवाह सोहळा.
कार्तिक शुक्ल द्वादशीच्या दिवशी तुलसीचा भगवान विष्णू यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर चातुर्मासामध्ये जी व्रतं घेतली होती त्याचीदेखील समाप्ती केली जाते. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या घराघरात कुळाचाराप्रमाणे तुलसीविवाह साजरा केला जातो. या तुलसीविवाहासोबत पुन्हा लग्नाळू लोकांच्या लग्नाचे बार उडवण्यास सुरूवात होते.
तुलसीविवाह आमंत्रण पत्रिका
#1
कुर्यात सदा मंगलम!
आमच्या येथे 27 नोव्हेंबर दिवशी सायंकाळी 7.05 च्या मुहूर्तावर तुलसीविवाह संपन्न होणार आहे,
तरीही आपण यंदा ऑनलाईन उपस्थिती लावण्यसाठी हे अगत्याचं आमंत्रण!
आमच्या तुळशीच्या लग्नाला नक्की या!
विवाह तारीख - 27, नोव्हेंबर / शुक्रवार
विवाह मुहूर्त- सायंकाळी 7.05

#2
सॉरी Friends,
I Am Very सॉरी..!!
लग्न इतक्या गडबडीत ठरलं,
आणि लग्नाची तारीख पण खुपच लवकर काढली..!!
त्यामुळे सगळं जमवायला वेळ ही खुप कमी मिळालाय,
ह्या लग्नाच्या धावपळीत तुमच्या पर्यंत
पत्रिका पोहचो न पोहचो तरी
हेच निमंत्रण समजुन तुम्ही या..
लग्नाची तारीख 27-11-2020 आहे, संध्याकाळीः 7.12 वाजता
.
.
.
आमच्या तुळशीच्या लग्नाला यायचं हं!
#3
आज आमच्या तुळशीच्या लग्नाला यायच हं...
वेळ - संध्याकाळी 7.30 वाजता
लग्न आमच्या दारात आणि जेवणाची सोय तुमच्या घरात केलेली आहे!
विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी ऑनलाईन लिंक-
तुलसी विवाहाच्या वेळेस घरातील तुळशीच्या रोपट्याला सजवून तिला नवरीप्रमाणे तयार केले जाते. महाराष्ट्रात तुळशीसमोर लहान मुलांना उभं करून त्यांचं तुळशीसोबत प्रातिनिधिक रूपाने लग्न लावलं जातं. यावेळी मंगलाष्टक गाण्याची पद्धत आहे. लग्न लागल्यानंतर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला जातो. एकमेकांना गोडाचे पदार्थ दिले जातात.