Tulsi Vivah 2020 | Photo Credits: Instagram/ deckedup.by.dr.vijeta.singh

Tulsi Vivah Mangalashtak in Marathi Lyrics: दिवाळी संपली की अनेकांना उत्सुकता असते ती म्हणजे तुळशीच्या लग्नाची! आज कार्तिकी एकादशीपासून (Kartiki Ekadashi)  कार्तिकी पौर्णिमेपर्यंत (kartiki Pournima) तुलसी विवाहाची (Tulsi Vivah) धामधुम घराघरात ते अगदी मोठ्या मंदिरांमध्येही रंगणार आहे. लग्नाचे विधी हे मंगलाष्टकांशिवाय (Mangalashtak) पूर्ण होणं अशक्य आहे. त्यामुळे आज तुळशीच्या लग्नाला मंगलाष्टकाच्या सूरात लक्ष्मीच्या रूपात 'तुळस' आणि भगवान विष्णूच्या रूपात 'शाळीग्राम' यांचा विवाह लावताना तुम्ही देखील सज्ज असाल तर पहा कोणकोणती मंगलाष्टक आहेत. सर्वसाधारणपणे नवादांम्पत्यांच्या मनातील भावना, त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी 8 मंगल मंत्रांमधून व्यक्त करण्याच्या पद्धत म्हणजे मंगलाष्टकं. Tulsi Vivah 2020 Marathi Invitation Card: तुलसी विवाह आमंत्रण WhatsApp Messages, Images द्वारा शेअर करत आप्तेष्टांना द्या तुळशीच्या लग्नाचं निमंत्रण

यंदा तुलसी विवाहाची धामधूम महाराष्ट्रात आज 26 नोव्हेंबर दिवशी कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तापासून सुरू होणार आहे. तर 30 नोव्हेंबर पर्यंत हे तुलसी विवाह सुरू राहणार आहेत. तुमच्या कडे कोणत्याही दिवशी या काळात विवाह सोहळा पार पाडला जाऊ शकतो. Tulsi Vivah Shubh Muhurat 2020 Time: महाराष्ट्रात आजपासून तुळशी विवाहाला प्रारंभ; जाणून घ्या तारखा आणि शुभ मुहूर्त

तुलसी विवाह मंगलाष्टकं

तुळशी पूजा मंगलाष्टकं

मंगलाष्टकं लग्न गीतं

मराठी मंगलाष्टक

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।

बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||

लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |

ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मङ्गलं || १ ||

गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।

कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।

क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।

पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।।

लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।

गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।

अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।

रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।

राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।

ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।

आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।

रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।

लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।

रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।

दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।

धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।

लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।

साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।

सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।

गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।

विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।

सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।

रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।

तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।।

आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।

गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।

दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।

वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।

दरम्यान तुळशीच्या लग्नाच्या दिवशी घरातील तुळस नवरीप्रमाणे सजवून तिच्यासमोर नवर्‍याच्या रूपात घरातील किशोर वयीन मुलगा उभा केला जातो. तुलसी विवाहाच्या निमित्ताने घरात गोडा-धोडाचे पदार्थ बनवले जातात. सामान्य लग्नाप्रमाणेच या तुलसी विवाहामध्येही मंगलाष्टकं गाऊन, अक्षता पाडून विवाह सोहळा संपन्न केला जातो. त्यानंतर फटाके फोडून हा आनंदोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे.