Tulsi Vivah 2020 Wishes in Marathi: कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह पर्व सुरु होतो. या दिवशी तुळस आणि भगवान विष्णूचे लग्न लावले जाते. यंदा 26 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत तुळशी विवाह (Tulsi Vivah) करता येईल. या दिवशी विष्णूच्या जागी छोट्या मुलाला लग्नासाठी नवरा मुलगा म्हणून उभे केले जाते आणि अतिशय साग्रसंगीत आणि थाटामाटात तुळशीचे लग्न लावले जाते. यंदा कोरोना व्हायरसमुळे सोशल डिस्टंसिंगचे (Social Distancing) भान राखत हा उत्सव साजरा करायचा आहे. त्यासाठी तुमच्या आप्तेष्ठांना तसेच मित्रमंडळींना या सणाच्या शुभेच्छा (Wishes) देण्यासाठी तुम्ही सोशल मिडियाचा वापर करु शकता.
मोबाईलवरुन मेसेजेस, ग्रिटींग्सद्वारे तुम्ही एकमेकांना तुळशी विवाहाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला छान मराठीतील शुभेच्छा संदेशांची आवश्यकता पडेल. त्यासाठी खास तुळशी विवाहाचे शुभेच्छा संदेश
ज्या अंगणात तुळस आहे,
तिथे देवी-देवतांचा वास आहे
ज्या घरात ही तुळस आहे
ते घर स्वर्गासमान आहे.
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
ऊसाचे मांडव सजूया आपण
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही सामिल व्हा आमच्या आनंदात
तुळशीचे लग्न लावूया थाटात
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
हेदेखील वाचा- Tulsi Vivah 2020 Date and Shubh Muhurat: यंदा तुळशी विवाह कधी आणि कसा कराल? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व
सारे आप्तेष्ठ, मित्र मंडळी झाली मग्न
कारण सर्व मिळून साजरे करणार तुळशीचे लग्न
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
तुळशीविना घराला घरपण नाही
तुळशीविना अंगणाला शोभा नाही
जिच्या असण्याने सर्वांना मिळते ऑक्सिजन
त्या तुळशीचा विवाह साजरा करुया सर्वजण
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
सण आनंदाचा, सण मांगल्याचा
सण सौख्याचा, सण तुळशी विवाह पर्वाचा
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
तुळशीचे लग्न लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. म्हणजेच घरात धनधान्य, संपत्ती आणि इतर मालमत्ता वाढते असे पुराणात म्हटले आहे. मात्र सण म्हटला की नात्यातील दुरावा दूर होऊन लोक एकत्र येतात. म्हणूनचा हा दुरावा दूर करण्यासाठी घरी राहून देखील तुम्ही सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांना तुळशी विवाहाचे शुभेच्छा संदेश पाठवू शकता.