Teddy Day 2020: 7 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन वीक'ला (Valentine Week) सुरुवात झाली आहे. 14 फेब्रुवारीला साजरा केला जाणाऱ्या 'व्हॅलेंटाइन डे' (Valentine Day) पूर्वीचा हा आठवडा प्रेमी युगूल मोठ्या जल्लोषात साजरा करतात. प्रेमात पडलेली तरुणाई या दिवसांची आतुरतेने वाट पाहत असते. 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यामागचा इतिहासही फारच रोमांचक आहे. रोम राज्यातून 'व्हॅलेंटाइन डे' साजरा करण्यास सुरुवात झाली होती.
प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस 'संत व्हॅलेंटाइन' यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. या आठवड्यात 10 फेब्रुवारीला येणारा 'टेडी डे' (Teddy Day) साजरा केला जातो. टेडी डेच्या दिवशी आपल्या जोडीदाराला टेडी बियर गिफ्ट देण्याची प्रथा आहे. व्हॅलेंटाईन वीकमधील चौथा दिवस 'टेडी डे' म्हणून साजरा केला जातो. (हेही वाचा - Teddy Day 2020 Gift Ideas: 'टेडी डे' निमित्त आपल्या जोडीदाराला द्या 'हे' खास गिफ्ट)
'टेडी डे' साजरा करण्यामागचे महत्त्व आणि कारण -
टेडी बियर हे प्रेमाचे आणि निरागसतेचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे आपल्या प्रियकराला आपली नेहमी आठवण राहावी यासाठी या दिवशी टेडी बियर गिफ्ट देण्याची पद्धत रुढ झाली. विशेष म्हणजे मुलींना टेडी बियर अत्यंत आवडतात. त्यामुळे या दिवशी आपल्या प्रियसीला तिच्या आवडीच्या रंगाचा टेडी गिफ्ट म्हणून दिला जातो. तुम्ही या दिवशी आपल्या प्रेमाची जाणीव करून देणारा टेडी आपली बायको, पार्टनर, नवरा आणि इतर आवडीच्या लोकांना देऊ शकतो.
जोडप्यांव्यतिरिक्त लहान मुलेही 'टेडी डे' साजरा करतात. बाजारात अनेक रंगाचे टेडी विक्रीस ठेवले जातात. आपल्या आवडत्या व्यक्तीपर्यंत आपल्या भावना पोहचवण्यासाठी टेडी बियर महत्त्वाचे काम करतो. त्यामुळे या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला टेडी गिफ्ट देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात.
'टेडी डे' साजरा करण्यामागचा इतिहास -
'टेडी डे' नेमका का साजरा केला जातो ? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जागतिक पातळीवर 'टेडी डे' साजरा करण्यामागे मोठा इतिहास आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती थियोडोर रुझवेल्ट एकदा मिसीसिपीवरून लुसियानाची यात्रा करत होते. त्यावेळी त्यांना झाडावर तडफडत असलेले अस्वल दिसले. या अस्वलाला तडफडताना पाहुन रुझवेल्ट यांनी त्याला मारण्याचा आदेश दिला.
अस्वलाला होत असलेल्या वेदना लक्षात घेऊन रुझवेल्ट यांनी हा आदेश दिला होता. त्यानंतर ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण अमेरिकेत पसरली. या घटनेवर बेरीमेन नावाच्या व्यंगचित्रकाराने कार्टुन काढले. हे कार्टुन लोकांना खूपचं आवडलं. तसेच लहान मुलांच्या खेळण्या बनवणाऱ्या एका दुकानदाराच्या पत्नीने या अस्वलाचे खेळणे बनवले आणि त्याला 'टेडी बियर' असे नाव देण्यासाठी राष्ट्रपती रुझवेल्ट यांची परवानगी मागितली. कारण रुझवेल्ट यांचे टोपणनाव 'टेडी' होतं. त्यावेळी रुझवेल्ट यांनी या नावाला होकार दर्शवला. तेव्हापासून 'टेडी बियर' अस्तित्वात आला.