भारताच्या प्रजासत्ताक दिनाची (Republic Day 2021 )तयारी यंदा अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान दरवर्षी 26 जानेवारीला सैन्य दलाच्या संचलनाइतकेच अनेकांचं लक्ष लागलेले असते ते म्हणजे प्रत्येक राज्याच्या चित्ररथाकडे (Tableau). महाराष्ट्राकडून यंदा राजपथावर राज्याच्या संत परंपरेचे (Saints Of Maharashtra) दर्शन घडणार आहे. आज त्याची पहिली झलक प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या चित्ररथावर यंदा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि शिवाजी महाराजांची भेट, विठ्ठल यांचं दर्शन होणार आहे. संत परंपरा आणि भक्ती चळवळीचा राज्यात धार्मिक विचारांवर कसा प्रभाव पडला? याचंं प्रदर्शन या चित्ररथातून होणार आहे. 26 जानेवारीला 9 वाजल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरूवात होणार आहे. तेव्हा हा चित्ररथ पाहता येणार आहे. यावर्षी प्रजासत्ताकदिनी राजपथावर एकूण 32 चित्ररथ पथसंचलात सहभागी होणार आहेत.केंद्रीय मंत्रालयांचे 15 चित्ररथ सहभागी होणार आहेत तर महाराष्ट्रासह अन्य 17 राज्यांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत.
दरम्यान यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे. तसेच यंदा परदेशी पाहुणे देखील नसतील. यावर्षी युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आमंत्रण होते पण काही दिवसांपूर्वीच युकेमध्ये म्युटेट कोरोनावायरस आणि त्याच्यामुळे वाढलेली रूग्णसंख्या पाहता त्यांचा दौरा रद्द झाला आहे. त्यामुळे मर्यादित लोकांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत यंदा सारा सोहळा पार पडेल. Bhawana Kanth, यंदा 26 जानेवारीला Republic Day Parade मध्ये सहभागी होणारी पहिली Woman Fighter Pilot.
महाराष्ट्राचा 2021 चा चित्ररथ
The Tableau of Maharashtra is ready for #RepublicDay2021 Parade. The Tableau is based on "Saints Of Maharaahtra"
The Tableau highlights the influence of #BhaktiMovement which brought a great change in religious beliefs of people in #Maharashtra.#RepublicDayParade2021 pic.twitter.com/Lzvpwsnakn
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) January 22, 2021
दरम्यान 2018 साली महाराष्ट्राने शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ साकारला होता, त्याला प्रथम क्रमांक मिळाला होता. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ येताच जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी राजपथाचा परिसर दुमदुमून गेला होता. मागील वर्षी महाराष्ट्राच्या रंगभूमीच्या 175 व्या वर्षाच्या आधारित चित्ररथाचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र या चित्ररथाला नाकारण्यात आले होते.