Swami Vivekananda Jayanti Wishes 2022: स्वामी विवेकानंद जयंती शुभेच्छा मराठी संदेश,Messages, Quotes सोशल मीडीयात शेअर करत साजरा करा युवक दिन!
Swami Vivekanand Jayanti| File Images

रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य आणि हिंदू विचारवंत स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda)  यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय युवक दिन' (National Youth Day) म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त (Narendranath Datta) होते. रामकृष्णांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आज त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत स्वामी विवेकानंद जयंतीच्या शुभेच्छा सोशल मीडीयामध्ये WhatsApp Status, Wishes, Messages, Quotes द्वारा शेअर करत या दिवसानिमित्त युवकांना सकात्मकता आणि प्रेरणा द्यायला विसरू नका.

दरम्यान स्वामी विवेकानंद यांच्या जन्म 12 जानेवारी 1863 दिवशी झाला आहे. ते मूळचे पश्चिम बंगालचे होते. तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास करण्यासोबतच त्यांनी 1884 मध्ये बी.ए. ची परीक्षा देखील पास केली होती. रामकृष्णांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यामध्ये अनेक बदल झाले. रामकृष्णांनी नरेंद्र यांना संन्यासदीक्षा देत त्यांचे नाव `स्वामी विवेकानंद’ असे केले होते. हे देखील नक्की वाचा: National Youth Day 2022: स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याकडून शिकण्यासारख्या दहा मनोरंजक गोष्टी.

स्वामी विवेकानंद जयंती शुभेच्छा

Swami Vivekanand Jayanti| File Images
Swami Vivekanand Jayanti| File Images
Swami Vivekanand Jayanti| File Images
Swami Vivekanand Jayanti| File Images
Swami Vivekanand Jayanti| File Images

स्वामी हे हिंदू तत्त्वज्ञानाच्या 'वेदान्त' शाखेचे पुरस्कर्ते होते. आद्य शंकराचार्य यांच्या विचारांना पुढे नेण्याचे काम त्यांनी केले. आज जगात रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. रामकृष्ण मठाची स्थापना श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकाता येथे केली. शुक्रवार, जुलै 4, 1902 ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली.