Subhash Chandra Bose Jayanti 2019: मृत्यू ही एक अटळ गोष्ट आहे. जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे पण नेताजी सुभाषचंद्र बोस ही एक अशी व्यक्ती आहे ज्यांच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे. 1945 साली जगात दुसरं महायुद्ध (Second World War) पेटलं होतं त्यावेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी प्र्यत्न करत होते. या स्वातंत्र्यासाठी त्यांनी भारताबाहेर जाऊन प्रयत्न केले होते.
सुभाषचंद्र बोस यांनी आजाद हिंद सेना जपानच्या सिंगापूरमध्ये तयार केली. भारतातील ब्रिटीशांची सत्ता उलथून लावण्यासाठी ही संघटना उभरण्यात आली होती. मात्र यापूर्वीच ब्रिटन आणि अमेरिकेने मिळून जपानवर हल्ला केला होता. जपान 15 ऑगस्ट 1947 रोजी अमेरिकेसमोर झुकले. त्यामुळे नेताजींनी आपलं बस्तान हलवलं.नेताजी त्यांच्या साथीदारांसोबत निघाले. ‘नेता जी की रहस्यगाथा’ या पुस्तकात असलेल्या उल्लेखानुसार, जपान महायुद्धामध्ये हरणार असल्याचं चित्र समोर असल्याने टोकियोऐवजी नेताजी रशियामध्ये पोहचले होते.
महायुद्धाच्या दरम्यान जपानहून नेताजींनी आंबेडकर यांच्याकडे पत्राद्वारा मदत मागितली होती. नेताजींचं विमान तायवानमध्ये क्रॅश झालं. तेथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात करण्यात आले. तायवानकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 1945मध्ये मरणार्या 200लोकांच्या यादींमध्ये नेताजींचं किंवा त्यांच्या साथीदारांचे नाव नाही.
पंडीत नेहरू यांनी नेताजींच्या कुटुंबांची जासूसी केली होती. मात्र जर सरकार त्यांच्या पहिल्या कमिशनच्या निर्णयावर ठाम असेल तर पुन्हा गुप्तहेर ठेवून माहिती मिळवण्याची काय गरज होती? असा प्रश्नदेखील समोर आला होता.
नेताजींच्या मृत्यू बाबत सरकारकडून सार्वजनिकरित्या कधीच कोणतीच माहिती समोर आली नाही. त्यांच्या मृत्यूबाबत सरकारी दरबारात 217 सिक्रेट फाईल्स आहेत. त्यामुळे नेताजींचा मृत्यू विमान अपघातामध्ये झाला असं भासवलं जातं मात्र मूळात स्वातंत्र्यलढ्यातील काही मंडळींनी त्यांची परदेशात हत्या घडवून आणल्याची चर्चादेखील आहे.