Shivtej Din 2021 Messages: जगाच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राइक म्हणजे लालमहालात शाहिस्तेखानाविरुद्ध झालेले युद्ध होय. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रम 'शिवतेज दिन' म्हणून साजरा केला जातो. चैत्र शुद्ध अष्टमीला ही घटना घडली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यातील लालमहालामध्ये काही मावळ्यांच्या साथीने लाखभर सैन्य सोबत असलेल्या शाहिस्तेखानाला सळो की पळो करून सोडले होतं.
शिवतेज दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मराठमोळे Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images शेअर करून शिवभक्तांना खास शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला खालील ईमेजचा नक्की उपयोग होई. (वाचा - Rama Navami 2021 Date: श्रीरामनवमी यंदा 21 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व)
पापणीला पापणी भिडते,
त्याला निमित्त म्हणतात...
वाघ दोन पावलं मागे सरकतो,
त्याला अवलोकन म्हणतात...
आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला
छत्रपती शिवराय म्हणतात
शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर...
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती
शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून,
जनतेकडून मायेने हात फिरवणारा
तो माझा "शिवबा" होता, "शिवराय" हे फक्त नाव
नव्हे तर ,जगण्याची प्रेरणा आणि यशाचा मंत्र आहे
सर्व शिवभक्तांना शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण
जय शिवराय... शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
ना शिवशंकर, ना कैलासपती
ना लंबोदर तो गणपती,
नतमस्तक तया चरणी, ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा तो राजा छत्रपती
शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
शिवाजी महाराज काही निवडक मावळ्यांना घेऊन लालमहालात शिरले. त्यांनी शाहिस्तेखानाची धांदल उडवली. यावेळी शाहिस्तेखानाने निसटून जाण्याचा प्रयत्न केला. या लढाईत शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली गेली. याशिवाय त्याचा मुलगाही या लढाईत मारला गेला. त्यानंतर शाहिस्तेखानाने तीन दिवसात पुणे सोडले आणि तो दिल्लीला निघून गेला.