
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे अवघ्या महाराष्ट्रासाठी मानाचं पान आहे. कुशल प्रशासक म्हणून त्यांच्याकडे आजही पाहिलं जातं. त्यामुळे या आदर्शव्रत व्यक्तीकडे पाहण्याचा अंदाज देखील शिवभक्तांसाठी खास आहे. शिवरायांच्या जयंती, पुण्यतिथी प्रमाणेच त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा देखील शिवभक्त साजरा करतात. हिंदू कॅलेंडरनुसार, शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी आपला राज्याभिषेक करून घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी शिवभक्त तिथीनुसार आणि तारखेनुसार देखील शिवराज्याभिषेक दिन (Shiv Rajyabhishek Din )साजरा करतात. यंदा तिथी नुसार राज्याभिषेक दिन 2 जून दिवशी साजरा केला जाणार आहे. मग या मंगलदिवसाचा आनंद तुमच्या नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळींसोबत देखील साजरा करा. त्यासाठी मराठमोळी WhatsApp Status, Wishes, Messages, Images तुम्ही सोशल मीडीयात शेअर करून या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकाल.
यंदाचा राज्याभिषेकोत्सव दिन खास असण्यामागील कारण म्हणजे हा 350 वा राज्याभिषेक दिन आहे. त्यामुळे शिवभक्तांसोबतच राज्य सरकार कडून देखील हा सोहळा भव्य स्वरुपात साजरा केला जाणार आहे. रायगडावर त्यानिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नक्की वाचा:'अफजल खानाच्या वधाच्या वेळेस शिवरायांनी वापरलेली वागनखं ब्रिटन मधून परत आणण्यासाठी प्रयत्न करणार' - सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा.
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

स्वराज्याचा ज्यांना लागला होता ध्यास
स्वराज्य मिळवणे ही एकच होती ज्यांची आस
त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगला आज खास
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!
जय शिवराय

दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं...!!
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

इतिहासालाही धडकी भरेल
असं धाडसं या मातीत घडलं,
दगड-धोंड्यांच्या स्वराज्यात
सुवर्णसिंहासन सजलं
शिवराज्याभिषेक दिनाच्या
सार्या शिवभक्तांना शुभेच्छा!
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा एक मंगलमय आणि जनतेसाठी महत्त्वाचा दिवस होता. राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा. राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी त्यांनी राज्याभिषेकानंतर अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आहे.
रायगडावर संपन्न झालेल्या या शिवराज्याभिषेकामध्ये शिवरायांसोबतच त्यांच्या पत्नी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून संभाजी महाराजांचा देखील अभिषेक करण्यात आला होता.