
Bhogi 2023 Messages: नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो. विशेष करून महाराष्ट्रात भोगीचा सण उत्साहात साजरा केला जातो. यंदा भोगी हा सण 14 जानेवारी 2023 रोजी साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते. भोगीच्या दिवशी इंद्राची पूजा केली जाते. वर्षानुवर्ष चांगले पीक यावे म्हणून भोगीच्या दिवशी शेतकरी बंधू इंद्रदेवाला प्रार्थना करतात.
भोगीच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. तुम्ही देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्र-परिवारास खास मराळमोळ्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील भोगी Greetings, WhatsApp Status, Wallpapers, Images डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Haldi Kumkum 2023 Rangoli Designs: हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त काढा या आकर्षक रांगोळी डिझाईन्स; Watch Video)
भोगी आणि मकरसंक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

दु: ख असावे तीळा सारखे
आनंद असावा गुळासारखा
तुमचे अवघे जीवन असावे तीळगुळासारखे
भोगी व मकर संक्रांत सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

भोगीच्या तुम्हांस व तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

संक्रांतीचा पहिला सण
'भोगी' च्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!

नववर्षातला पहिला सण
भोगी सणाच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!

देशभरात भोगी साजरी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. भोगी हा सण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते. जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर थंडी असते. त्यामुळे भोगीच्या भाजी मध्ये उष्णतेचा गुणधर्म असतो, ज्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळते.