Navratri 2020 Colours for Facemask Calender: भारतामध्ये यंदा नवरात्रीची (Navratri) धूम 17 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या नऊ दिवसामध्ये रंगणार आहे. दुर्गा मातेची 9 रूपं या नऊ दिवसांमध्ये पुजली जातात. देशभरात नवरात्रीचा सण साजरा करण्याची प्रथा, परंपरा वेगवेगळी असली तरीही आजकाल सर्वत्र नवरात्रोत्सव (Navratrotsav) साजरा करताना एक नवा पायंडा पडला आहे तो म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दररोज सगळे जण एकाच रंगाचे कपडे घालतात. नऊ दिवसांसाठी नऊ विशिष्ट रंगांचा क्रम पाळला जातो. यंदा सणासुदीवर कोरोना व्हायरस संकटांचं सावट असल्याने देवीचा भव्य सोहळा, गरबा होणार नाही त्यामुळे मित्र-मैत्रिणींसोबत नवरात्रीमध्ये फिरताना तुम्ही रंगांचा क्रम यंदा पाळू शकत नाही पण जर तुम्ही कामानिमित्त बाहेर पडणार असाल तर तुम्हांला मास्क घालणं आवश्यक आहे. पण त्यामध्येही तुम्ही नवरात्रीचे नऊ रंग पाळणार असाल तर जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचा मास्क तुमच्याकडे असायला हवा. COVID-19 Pandemic सोबत यंदा शारदीय नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हा आगामी सणासुदीचा काळ सेलिब्रेट करताना सुरक्षित राहण्यासाठी या 5 गोष्टींबाबत दक्ष रहाच!
घरच्या घरी सुती कपड्यांचे तुम्ही मास्क बनवू शकता. मग त्यामध्ये यंदा नवरात्रीचे नऊ रंग समाविष्ट करून हे मास्क करू शकता. यामुळे लॉकडाऊन, कोरोना वायरस जागतिक आरोग्य संकट यामुळे सतत नकारात्मकता आणि ताणा खाली असलेल्या तुम्हांला थोडा विरंगुळादेखील मिळू शकतो. सोबतच तुम्ही सुरक्षित राहून या नवरात्रोत्सवाचा आनंद घेऊ शकता. Navratri 2020 Calendar: घटस्थापना, खंडे नवमी ते दसरा यंदा नवरात्री मध्ये कोणत्या दिवशी? जाणून घ्या त्याचे पुजा विधी, महत्त्व.
नवरात्री 2020 साठी कसा असेल फेस मास्क साठी रंगांचा क्रम?
Navratri MASK colors😁😆😁😆😁 pic.twitter.com/wkIOa1tYGR
— Ankit Doshi (@Ankit_AD) September 29, 2020
सोशल मीडीयामध्ये सध्या नवरात्री नऊ रंगांची यादी विविध मेसेज मधून शेअर केली जात आहे.
नवरात्री 2020 नऊ रंग
आदिशक्तीच्या पूजनाला घटस्थापनेपासून सुरूवात होते आणि दसरा सणाला त्याची सांगता होते. या देवीच्या जागरात यंदा तुम्ही घरबसल्याच सहभागी होणार असलात तरीही सणाच स्पिरीट कमी होऊ देऊ नका. या दिवसांमध्ये तुम्ही सुरक्षित अंतर पाळून, व्हर्च्युअल जगात सण साजरा करू शकता. मग तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना यंदा नवरात्री नऊ रंगाची यादी शेअर करून सहभागी होण्यासाठी आमंत्रित करू शकता.
दरम्यान नवरात्रीचे नऊ रंग आणि सणाचा कोणताही धार्मिक संबंध नाही. मागील काही वर्षांमध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजीमधून ही संकल्पना पुढे आली असून आता त्याचा सोशल ट्रेंड झाला आहे.