Happy Kojagiri Purnima Wishes (File Image)

Kojagiri  Purnima 2024: आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री हिंदू धर्मात विशेष मानली जाते. कारण या रात्री चंद्र पूर्णपणे चमकतो म्हणजेच चंद्र 16 कलांनी भरलेला असतो. या दिवशी उपवास केल्याने मनुष्य सुख आणि समृद्धी प्राप्त करतो. असे मानले जाते की, शरद पौर्णिमेला पूजा केल्याने घरामध्ये सौभाग्य आणि समृद्धी येते आणि चांदण्या रात्री खीर खाल्ल्याने आरोग्यास लाभ होतो. या दिवशी मंदिरात गेल्याने मन शांत होईल. कोजागिरी पौर्णिमा ही आध्यात्मिक वाढीसाठी चांगली संधी आहे. अश्विन महिन्याच्या पौर्णिमा तिथी 16 ऑक्टोबर, रात्री 08:40 पासून ते 17 ऑक्टोबर, दुपारी 04:55 वाजता समाप्त होईल.  16 ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे. चंद्रोदयाची वेळ 05:05 असणार आहे.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काय करावे?

देवी लक्ष्मीची पूजा करा आणि संपत्तीसाठी प्रार्थना करा. घरात दिवा लावा, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येईल. चंद्राला जल अर्पण करा आणि मंत्रांचा उच्चार करा.  लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करा. धार्मिक ग्रंथ वाचा. गरजूंना दान करा.

कोजागिरीपौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी करू नका

कोणाशीही वाद घालू नका. रागावू नका. तुम्ही खोटे बोलू नये. शरद पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही तामसिक अन्न खाऊ नये. याशिवाय या दिवशी लसूण आणि कांदा खाण्यास मनाई आहे. या दिवशी काळा रंग वापरू नका आणि काळे कपडे घालू नका. आपण चमकदार पांढरे कपडे परिधान केल्यास चांगले होईल.