Shani Rashi Parivartan 2020: मौनी अमावस्या दिनी आज होणार शनीचे संक्रमण; पहा कोणत्या राशीवर काय परिणाम होणार?
शनी संक्रमण 2020 (File Photo)

Mauni Amavasya 2020:  हिंदू पुराणानुसार, आज 24 जानेवारीला मौनी अमावास्येच्या (Mauni Amavasya) तिथीवर शनी ग्रहाचे (Shani)  मकर (Makar)  राशींमध्ये संक्रमण होणार आहे. तब्बल 150 वर्षानंतर शनी संक्रमणाचा हा योग्य मौनी अमावास्येच्या तिथीवर जुळून आला आहे. ग्रहांच्या अभ्यासकांच्या माहितीन्वये शनी देव (Shani Dev) तब्बल अडीच वर्ष एका राशीमध्ये वास्तव्य करतात, आणि ज्या राशीत शनी निवास करतो त्यांच्या अगदी पुढच्या आणि मागच्या राशीवर शनीचा सर्वाधिक प्रभाव जाणवून येतो. येत्या 24  जानेवारीला मकर राशीत शनी प्रवेश झाल्यावर पुढील अडीच वर्षासाठी अन्य राशींवर देखील परिणाम होणार आहे, आपण जाणूनच असाल की शनीच्या प्रभावाला साडेसाती असेही म्हणतात. हा कालावधी काही राशींच्या बाबतीत अडीच वर्षे तर काहींच्या बाबतीत साडे सात वर्षे इतका असतो. हा काळ किंचित अशुभ देखील मानला जातो. यंदा मकर राशीमध्ये शनी संक्रमण झाल्यावर अन्य राशींवर येत्या वर्षात काय आणि कितपत परिणाम होणार हे आपण जाणून घेणार आहोत... (Maghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि)

मेष: मेष राशीपासून शनीचा प्रभाव सर्वात जास्त दूर असल्याने अगदी कमीत कमी परिणाम होणार आहे. मात्र अन्य ग्रहांच्या स्थितीनुसार या वर्षात तुमची आर्थिक परिस्थिती काहीशी बिकट असणार आहे. करिअर मध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला कठीण परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. या येत्या काळात तुमच्या मित्रांना शक्य तितके जोडून ठेवा.

वृषभ : ही रास शनीच्या प्रभाव कक्षेपासून नवव्या स्थानी असणार आहे, त्यामुळे अधिक परिणाम जाणवणार नाही. याउलट शनी तुमच्यासाठी भाग्यवंत ठरणार आहे, व्यापार व प्रेमसंबंध अधिक मजबूत होण्याची पूर्ण संधी आहे.

मिथुन: शनी पासून लांब असूनही या राशीत अगोदरच राहूचे वास्तव्य असल्याने समस्या कमी होण्याचे मार्ग कमी आहेत. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे येत्या काळात अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.

कर्क: शनिप्रवेशाच्या नंतरच्या काळात तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये फार समस्या येणार नाहीत, मात्र तुमच्या वैवाहिक जीवनात काळजी बाळगा. तुमच्या पार्टनरला अजिबात दूर होऊ देऊ नको.

सिंह: या राशीच्या व्यक्तिनावर शनीचा प्रभाव पडून साडेसाती सारखेच परिणाम अनुभवयास लागणार आहेत, मात्र चिंता करू नका कारण येत्या मार्च पासून सिंह राशीमध्ये गुरु ग्रहाचे संक्रमण होणार असून शनीचा प्रभाव कमजोर होईल.

कन्या: या राशीवर शनीचा प्रकोप काही काही वेळच्या अंतराने जाणवणार आहे. शनीचे संक्रमण होताच लगेचच तुम्हाला फार अडचणी येणार नाहीत मात्र पुढील काही काळात विशेषतः अमावस्येच्या तिथीवर अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. अन्य वेळेस धनसमृद्धी तुम्हाला लाभेल.

तुळ: या रशिपवून शनीची प्रभाव कक्षा स्पष्ट दिसू लागणार आहे. कोणतेही काम सफल करण्यासाठी तुम्हाला सर्वतोपरी मेहनत करणे आवश्यक असणार आहे. ही मेहनत करताना कुठेही संतुलन सोडू देऊन वागू नका.

वृश्चिक: शनीची अगोदरच सुरु असणारी साडेसाती आता शेवटच्या टप्प्यात आली आहे, परिणामी या राशीच्या व्यक्तींसाठी येत काळ हा फायद्याचा ठरणार आहे. कर्जापासून मुक्ती, धनाची प्राप्ती व वाहन सुख असा तिहेरी फायदा यंदा तुमच्या नशिबात आहे.

धनु: मकर राशीच्या अगोदरची सर्वात जास्त प्रभावित रास ही धनु असणार आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वात जास्त काळजीपूर्वक वागण्याची आवश्यकता आहे. खर्चावर नियंत्रण न ठेवल्यास, मिळकत कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती ओढावेल.

मकर: मकर रस ही थेट शनीचे वास्तव्य असणार आहे, त्यामुळे अडीच वर्ष शुभ कार्य करणे टाळता आले तर उत्तम. साड्या उत्तरायण सुरु असल्याने अलीकडेच सुर्वी देवाने या राशीत प्रवेश केला आहे, यामुळे शनीचा प्रभाव सुरुवातीला कमी असले मात्र कालांतराने समस्या जाणवू लागतील. या काळात विचारपूर्वक निर्णय घ्या.

कुंभ: शनीची साडेसाती सुरु होत आहे, खर्चांमध्ये वाढ, मानसिक तणाव आणि आरोग्याच्या समस्या सर्व काही एकत्रित आल्याने तुमचा गोंधळ होऊ शकतो, मात्र तुमचे प्रयत्नच तुम्हाला यातून बाहेर काढतील.

मीन: या राशीवर शनीच्या कक्षेत असूनही फार प्रभाव पडणार नाही, मात्र आर्थिक बाजू सावरून काम करा.

(टीप: हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लेटेस्टली मराठी यामार्फत कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही)