Ganesh Jayanti | Photo Credits: Instagram

Ganesh Jayanti 2020: गणेशभक्तांसाठी गणेश जयंती हा दिवस खास असतो. दरवर्षी माघ शुक्ल चतुर्थी दिवशी गणेश जयंती (Ganesh Jayanti)  साजरी केली जाते. महाराष्ट्रात दीड दिवस माघी गणेशोत्सव (Maghi Ganeshotsav) साजरी करण्याची पद्धत आहे. यंदा गणेश जयंती हा दिवस 28 जानेवारी दिवशी साजरी केली जाणार आहे. त्यादिवशी गणेश मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रमांची रेलचेल असते. माघ महिन्यातील चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस गणेश जयंती, वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते. Ganesh Jayanti 2020 Wishes: गणेश जयंतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा, ग्रीटिंग्स, Messages, GIFs,HD Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून गणेश भक्तांना द्या माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!

गणेश जयंती दिवशी हळद किंवा सिंदुर यांनी गणेश मुर्ती बनवण्याची पद्धत आहे. या गणपतीची विधीवत पूजा करून त्याचे दुसर्‍या दिवशी विसर्जन केले जाते. तर भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच यंदा गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते त्यामुळे यादिवशी गणपतीला तीळापासून बनवलेल्या पदार्थांचा प्रसाद दाखवला जातो. यादिवशी तीळाच्या पेस्टने स्नान केले जाते. Maghi Ganesh Jayanti 2020: तिलकुंद चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाला नैवेद्याला तीळाचे मोदक आणि करंजी चा नैवेद्य कसा बनवाल?

गणेश जयंती 2019 मुहूर्त

दाते पंचांगानुसार, यंदा गणेश जयंतीचा मुहूर्त 28 जानेवारी दिवशी सकाळी 8.23 पासून 29 जानेवारी पर्यंत रात्री 10. 46 पर्यंत आहे.

गणपतीचा पहिला अवतार वैशाख पौर्णिमेचा आहे. हा दिवस पुष्टीपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करतो. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा अवतार माघ शुक्ल चतुर्थीचा म्हणजेच गणेश जयंती म्हणून आपण साजरा करतो.