Maghi Ganesh Jayanti 2020: तिलकुंद चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाला नैवेद्याला तीळाचे मोदक आणि करंजी चा नैवेद्य कसा बनवाल?
Tilkund Chaturthi Special Recipes | File Photo

Tilkund Chaturthi Special Recipes: माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti) म्हणजे श्री गणेशाचा जन्मसोहळा. हिंदू कॅलेंडरच्या माघ महिन्याच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. हा दिवस तिलकुंद चतुर्थी (Tilkund Chaturthi) म्हणून देखील ओळखला जातो. माघ महिना ऋतूचक्रानुसार हिवाळ्यात साजरा केला जातो. त्यामुळे माघ महिन्यातील गणेश चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी साजरी करताना गणपती बाप्पाच्या नैवेद्यामध्ये तीळाच्या पदार्थांचा हमखास वापर केला जातो. मोदक (Modak) हा गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ आहे. त्यामुळे तिलकुंद चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाच्या नैवेद्यामध्ये तीळापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश केला जातो. मग यंदा बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी बनवल्या जाणार्‍या नैवेद्याच्या पदार्थांमध्ये तीळापासून बनवलेले मोदक आणि करंजी बनवण्यासाठी हे खास गोडाचे पदार्थ नक्की ट्राय करू शकता. Maghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि.

तिलकुंद चतुर्थी विशेष पदार्थ

गणपती बाप्पाला उपवासाला उकडीचे किंवा तळणीचे मोदक नैवेद्याला दाखवले जातात, मात्र तिलकुंद चतुर्थीला सारणामध्ये तीळाचा प्रामुख्याने वापर केला जातो. यामध्ये तीळ गुळाचा नैवेद्य ते तीळ गुळाचे लाडू अशा विविध पदार्थांचा समावेश असतो.

गणेश जयंती दिवशी हळद किंवा सिंदुर यांनी गणेश मुर्ती बनवण्याची पद्धत आहे. या गणपतीची विधीवत पूजा करून त्याचे दुसर्‍या दिवशी विसर्जन केले जाते. तसेच पूजा विधींमध्ये या दिवशी सकाळी स्नान करताना तीळाच्या पेस्टने मसाज करून आंघोळ केली जाते. गणेशभक्तांसाठी खास असलेल्या या दिवशी घरगुती स्वरूपात गणेश पूजन केले जाते. गणेश मंदिरामध्येही भक्तगण दर्शनासाठी मोठी गर्दी करतात.