
Maghi Ganesh Jayanti 2020 Marathi Wishes: माघी गणेश चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती (Ganesh Jayanti) यंदा 28 जानेवारी दिवशी साजरी केली जाणार आहे. धार्मिक कथा आणि पुराणांत दिलेल्या माहितीनुसार गणेश जयंती म्हणजेच माघ शुक्ल चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाचा जन्मसोहळा साजरा केला जातो. मग गणेश भक्तांसाठी खास असलेल्या माघी गणेश चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी दिवशी बाप्पाच्या जन्म सोहळ्याच्या शुभेच्छा फेसबूक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शेअर करून माघी गणेशोत्सव (Maghi Ganeshotsav) आणि गणेश जयंतीच्या शुभेच्छा देऊन या दिवसाचा आनंद द्विगुणित करा. मग तुमच्या प्रिय व्यक्ती, मित्रमैत्रिणींना 'गणेश जयंती'च्या शुभेच्छा, ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, HD Images, Wishes, GIFs, Messages शेअर करून या माघी गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करू शकता.
यंदा माघी गणेशोत्सवानिमित्त मुंबईच्या सिद्धिविनायक मंदीर, पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर सह अनेक लहान-मोठ्या गणेश मंदिरांमध्ये श्रीगणेश जन्मसोहळ्याची तयारी सुरू आहे. गणेश मंदिरांसोबतच महाराष्ट्रामध्ये माघी शुक्ल चतुर्थी दिवशी घरी गणपतीची मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याची प्रथा आहे. यानिमित्ताने घरामध्ये गणेशाचे पूजन केले जाते. मग तुमच्या प्रियजनांना, नातेवाईकांना गणेश जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही खास मराठमोळी देऊन हा गणपती बाप्पाचा जन्मसोहळा साजरा करा. Ganesh Jayanti 2020 Songs: गणेश जयंती निमित्त ऐका मन प्रसन्न करणारी 'ही' खास गाणी.
गणेश जयंती 2020 मराठी शुभेच्छा
माघी गणेश जयंती निमित्त
सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

समस्त गणेशभक्तांना माघी गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्या
गणपती बाप्पाची कृपादृष्टी कायम राहो, तुमच्या आयुष्यातील सारी विघ्न होवोत
हीच आमची गणराया चरणी प्रार्थना !
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
माघी गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्छा!
Maghi Ganesh Jayanti Wishes | File Photo
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोरया
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया
माघी गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्छा!

वंदन करतो गणरायाला
हात जोडितो वरद विनायकाला
प्रार्थना करितो गजाननाला
सुखी ठेव नेहमी तुझ्या भक्तगणांना
गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

माघ महिन्यातील चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस गणेश जयंती, वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखला जातो. यंदा गणेश जयंतीचा मुहूर्त 28 जानेवारी दिवशी सकाळी 8.23 पासून 29 जानेवारी पर्यंत रात्री 10. 46 पर्यंत आहे. त्यामुळे या वेळेदरम्यान गणेश जयंतीचा उत्सव साजरा केला जाऊ शकतो. मग तुमच्या प्रत्येक गणेशभक्त मित्राला, मैत्रिणीला आणि प्रिय व्यक्तीला यंदाच्या गणेश जयंतीच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका.