Ganesh Jayanti 2020 Songs: गणेश जयंती निमित्त ऐका मन प्रसन्न करणारी 'ही' खास गाणी
गणपती (Photo Credit : Pixabay)

Ganesh Jayanti 2020 Songs: प्रत्येक वर्षी माघ मासात शुक्ल पक्षात येणार्‍या चतुर्थीला 'गणेश जयंती' (Ganesh Jayanti) साजरी केली जाते. गणेश भक्तांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. पौराणिक मान्यतानुसार, माघ मासच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता. ग्रोगोरियल कॅलेंडर प्रमाणे 'माघ मास' जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये येतो. कोणत्याही शुभ कार्य सुरू करण्याआधी गणपतीची आराधना केली जाते. महाराष्ट्रात दीड दिवस माघी गणेशोत्सव (Maghi Ganeshotsav) साजरा केला जातो. यावर्षी 'गणेश जयंती' 28 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. यादिवशी गणेश मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. या दिवशी गणपती उपासना केल्याने निश्चित लाभ होतो. अग्निपुराणमध्ये मोक्ष प्राप्तीसाठी तिलकुंद चतुर्थी व्रताचे विधान सांगितले गेले आहे.

गणेश जयंतीला लोक गणपतीची प्रतिमा तयार करून त्याची पूजा करतात. तसेच तिळाने तयार केलेले पदार्थ गणपतीला अर्पण करतात म्हणून याला 'तिल कुंद चतुर्थी', असेही म्हटले जाते. गणेश जयंतीच्या दिवशी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. या दिवशी गणेशभक्त मंदिरात जाऊन गाणी गातात. तसेच काही लोक या दिवशी आपल्या घरात गणपतीची गाणी लावतात. तुम्हालाही या दिवशी बाप्पाची चांगली गाणी ऐकायची इच्छा होत असेल तर हा लेख तुमच्या नक्की उपयोगात येईल. चला तर मग बाप्पाची खास गाणी कोणती ती पाहुयात. (हेही वाचा - Maghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि)

गणपतीची खास गाणी - 

गणेश जयंती दिवशी हळद किंवा सिंदुर यांनी गणेश मुर्ती बनवण्याची पद्धत आहे. या गणपतीची विधीवत पूजा करून त्याचे दुसर्‍या दिवशी विसर्जन केले जाते. यादिवशी गणपतीला तीळापासून बनवलेल्या पदार्थांचा प्रसाद दाखवला जातो. यादिवशी पाण्यात तीळ टाकून अंघोळ केली जाते. यंदा गणेश जयंतीचा मुहूर्त 28 जानेवारी दिवशी सकाळी 8.23 पासून 29 जानेवारी पर्यंत रात्री 10. 46 पर्यंत आहे. गणेश भक्तांसाठी हा दिवस एक प्रकारची परवणीचं असणार आहे.