Shakambari Navratri 2020: शाकंभरी नवरात्रोत्सव तारीख, शुभ मुहूर्त, व्रत कथा आणि महत्त्व
शाकंभरी नवरात्र । Photo Credits: File Photo

Shakambari Navratri Utsav 2020:  पौष शुक्ल सप्तमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत  शाकंभरी नवरात्र साजरा केला जातो. यंदा हा उत्सव 3 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान साजरा केला जाणार आहे. भारताच्या विविध प्रांतांसोबतच महाराष्ट्रातही शाकंभरी देवीची पूजा केली जाते. शाकंभरी पौर्णिमा (Shakambari Purnima) ही पौष पौर्णिमेला असते. महाराष्ट्रातील काही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची ही कुलदेवता आहे. शाकंभरी देवीला 'बनशंकरी' असे आणखी एक नांव आहे. तिचे मुख्य स्थान विजापूर जवळ बदामी येथे आहे. शारदीय  नवरात्रीप्रमाणेच शाकंभरी नवरात्रीमध्येही आदिशक्तीची पूजा केली जाते. प्रत्येक चांद्रमहिन्याच्या पौर्णिमेला काही तरी विशेष महत्त्व आहे. यंदा 10 जानेवारीला  ‘शाकंभरी पौर्णिमा ‘ आहे. यादिवशी चंद्रग्रहण देखील आहे. Shakambari Navratri 2020 Wishes and Images: शाकंभरी नवरात्र निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers शेअर करुन द्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा!

शाकंभरी देवीच्या उत्पत्तीची कथा

देवीभागवत ग्रंथामध्ये शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेल्या माहितीनुसार,एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. लोक अन्नपाण्याविना उपाशी राहिले. त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला. देवीला या करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य शाक भाज्या उत्पन्न केल्या. त्या भूकेलेल्यांना खाऊ घातल्या. त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले. त्यामुळे या देवीला 'शाकंभरी' हे नांव मिळाले. तर एका धार्मिक कथेनुसार हरिद्वार- केदार रस्त्यावर कुमाऊॅं टेकडीवर देवीने एक हजार वर्षे केवळ शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली. त्यामुळे ही देवी ‘शाकंभरी देवी' या नावाची प्रसिद्धी मिळाली. महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात त्याबाबतचे संदर्भ आढळतात अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.

शाकंभरी पौर्णिमा शुभ मुहूर्त 

Drik Panchang च्या माहितीनुसार, पौर्णिमा 10 जानेवारी 2020 च्या मध्यरात्री 2 वाजून 34 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर समाप्ती 11 जानेवारी दिवशी 12 वाजून 50 मिनिटांनी होणार आहे. या उत्सवाची तुळजापूरच्या मंदिरातही मोठा उत्सव असतो.

आपले सण आणि उत्सव साजरे करण्यामागे काही आरोग्यदायी संकेत देखील असतात. हिवाळयात मुबलक भाज्या येतात. सणाच्या निमित्ताने या भाज्यांचा आस्वाद घेता यावा याकरिता हा छुपा उद्देश आहे.