
शहीद दिवस (Shaheed Diwas) हा भारतामध्ये 23 मार्चला साजरा केला जातो. देशासाठी प्राणांची आहुती देणार्या राजगुरू, सुखदेव आणि भगत सिंग यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ 23 मार्चचा शहीद दिवस पाळला जातो. भारताला ब्रिटीश राजवटीमधून मुक्त करण्यासाठी अनेक शूरवीरांनी भारतभूमीसाठी जीव ओवाळून टाकला. त्यांच्या बलिदानाचे या शहीद दिनाच्या निमित्ताने स्मरण केले जाते. ब्रिटीशांनी राजगुरू, सुखदेव आणि भगत सिंग यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा दिली होती. 23 मार्चला 1931 ला लाहोरच्या सेंट्रल जेल मध्ये हे तिघंही फाशीवर गेले. त्यांच्या देशभूमीसाठी प्राण त्याग करण्याच्या वृत्तीसमोर नतमस्तक होण्यासाठी आज सोशल मीडीयात WhatsApp Status, Facebook Messages, Quotes, HD Images शेअर करत या दिवशी त्यांना आदरांजली अर्पण करू शकता.
1928 मध्ये लाहोरमध्ये ब्रिटीश पोलीस अधिकार्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी या खटल्याचा खटला चालवण्यासाठी विशेष न्यायाधिकरणाची स्थापना केली. ज्याने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब नसतानाही फाशीची शिक्षा सुनावली होती. 23 मार्च 1931 रोजी लाहोर सेंट्रल जेलमध्ये या तिघांना फाशी देण्यात आली.
शहीद दिवस 2025





फाशीच्या वेळी भगतसिंग केवळ 23 वर्षांचे होते, पण त्यांचे धैर्य आणि बलिदान आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहे. 23 मार्च रोजी देशभरातील शाळा, महाविद्यालये आणि इतर ठिकाणी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. तरुणांना भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या देशभक्तीपासून प्रेरणा घेण्यास प्रोत्साहन दिले जाते.