
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी भारतभूमीवरील प्रेमासाठी ब्रिटीशांनी दिलेली फाशीची शिक्षा स्वीकारून हौतात्म्य पत्करलं. त्यांच्या बलिदानाचं स्मरण ठेवून आता भारतात 23 मार्च हा दिवस शहीद दिवस (Shaheed Diwas) म्हणून पाळला जातो. देशासाठी वीर मरण स्वीकारलेल्या सार्या हुतात्म्यांना या दिवशी आदरांजली व्यक्त करत कृतज्ञता अर्पण केली जाते. मग या दिवशी तुम्हीही शहिदांप्रति तुमचा आदरभाव व्यक्त करत हा दिवस थोडा स्पेशल करू शकाल. WhatsApp Status, Facebook Messages, Quotes, HD Images शेअर करत शहीदांप्रती आदरांजली डिजिटल माध्यमात शेअर करू शकता.
इंग्रज सरकार विरोधात भगत सिंह यांनी सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फोडला होता. नंतर त्यांनी स्वत: ला पोलिसांच्या हवाली केलं. लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी इंग्रजी अधिकारी सॉन्डर्सला गोळ्या घातल्या. नंतर या प्रकरणी भगतसिंहावर खटला चालवण्यात आला. या प्रकरणात भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 23 मार्च 1931 ला त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.
शहीद दिवसाच्या शुभेच्छा





23 मार्च हा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ पाळला जाणारा शहीद दिवस आहे. भारतात 30 जानेवारी दिवशी देखील महात्मा गांधींच्या स्मराणर्थ ए शहीद दिवस पाळला जातो. नथुराम गोडसेंनी हत्या करून गांधींची हत्या केल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थही शहीद दिवस पाळला जातो.