
भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अशा वीरांमध्ये वीर भगतसिंग, राजगुरू, आणि सुखदेव यांची नावे इतिहासाच्या पानावर सुवर्णअक्षरांनी कोरली गेली आहेत. आज 23 मार्च, याच दिवशी 1931 साली भगतसिंग, राजगुरू, आणि सुखदेव यांना लाहोर कारागृहात फाशी देण्यात आली होती. त्यांच्या बलिदाना स्मरणार्थ हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो. हे वीर शहीद झाले त्यावेळी भगतसिंग आणि सुखदेव अवघे 23 वर्षाचे आणि राजगुरू अवघे 22 वर्षाचे होते.
इंग्रजांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात, लाल लजपत राय यांच्या मृत्यूनंतर सर्वात प्रथम भगत सिंह यांनी सांडर्सची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर पब्लिक सेफ्टी आणि ट्रेड डिस्ट्रिब्यूट बिलाच्या विरोधात सेंट्रल अॅसेंबलीमध्ये बॉम्ब फेकला. या घटनेनंतर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना अटक झाली व त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.
23 मार्च 1931 ला संध्याकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी भारताच्या या तीन वीरांनी हसत हसत मृत्यूला कवटाळले. फाशीच्या वेळी तिघांनी 'मेरा रंग दे बसंती चोला, माय रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला।' हे गाणे गायले होते. आज भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव आपल्यात नाहीत पण त्यांचा आवाज आणि विचार आजही आपल्यात आहेत.
तर आजच्या शहीद दिवसानिमित्त खास मराठी Messages, Greeting, Whatsapp Status शेअर करून करा सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू या क्रांतीवीरांना विनम्र अभिवादन.





दरम्यान, भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबमधील लायलपूर येथे झाला. भगतसिंग हे त्यांचे साथीदार राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद आणि गोपाल यांच्यासोबत लाला लजपत राय यांच्या हत्येसाठी लढले. भगतसिंग त्यांच्या धाडसी कारनाम्यामुळे ते तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले. 8 एप्रिल 1929 रोजी त्यांनी आपल्या साथीदारांसह ‘इन्कलाब झिंदाबाद’चा नारा देत मध्यवर्ती विधानसभेवर बॉम्ब फेकला.
या तीन क्रांतिकारकांना 24 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात येणार होती. पण यामुळे देशातील जनता आंदोलनात उतरेल, अशी भीती इंग्रज सरकारला होती. त्यामुळे त्यांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना एक दिवस अगोदर 23 मार्च 1931 रोजी फाशी दिली. त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना न देता रात्री सतलज नदीच्या काठावर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.