शिर्डीच्या साईबाबांचे (Saibaba) अवतार मानले जाणारे सत्य साई बाबा (Sathya Sai Baba)यांची यंदा 94 वी जयंती आहे. 23 नोव्हेंबर 1926 साली त्यांचा पुट्टपर्थी या शहरात जन्म झाला होता. दरवर्षी त्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्त पुट्टपर्थी शहरात तसेच जगभरातील अनेक ठिकाणी त्यांचे भक्त हा आनंद साजरा करतात. यंदा सुद्धा पारंपरिक रथोत्सव आणि वीणा पठण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 23 नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते होणार आहे. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी स्वतःला साईबाबांचे अवतार म्हणून घोषित केले आणि त्यानंतर आपल्या अनुयायांचा मोठा वर्ग निर्माण करून त्यांनाही हाच विश्वास पटवून दिला. आपल्या हयातीत त्यांनी आध्यात्मिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी काम करून जगातील 126 देशांमध्ये 1200 सत्य साई बाबा केंद्र स्थापन करण्याचे मोठे काम केले आहे.यंदाच्या त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या आयुष्याशी निगडित काही खास गोष्टी आपण पाहणार आहोत.
सत्य साई बाबा यांचे मूळ नाव सत्यनारायण राजू (Satyanarayan raju) असे असून 1926 साली पुट्टपर्थी येथील एका गरीब हिंदू घरात त्यांचा जन्म झाला होता. आई- वडील, तीन भाऊ आणि दोन बहिणी असा त्यांचा परिवार होता. लोकांच्या म्हणण्यानुसार, सत्य साई बाबा यांचा जन्म ढेकळली चमत्कारिक वातावरणात झाला होता, त्यांच्या जणांच्या वेळी अचानक त्यांचयय घरात वाद्य वाजू लागली होती. (Bhagwat Ekadashi 2019: भागवत एकादशी निमित्त जाणून घ्या पूजाविधी आणि एकादशी व्रताचे महत्त्व)
जेव्हा, सत्यनारायण हे 13 वर्षाचे होते तेव्हा एका विंचवाने त्यांना दंश केला होता, ज्यानंतर काही तास ते पूर्णतः कोमात होते. काही तासांनी जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा, त्यांचे वागणे पूर्णतः बदलले होते. त्यांनी अचानक संस्कृत मध्ये गाणी गाण्यास सुरुवात केली तर त्यांचे शरीरही आधीपेक्षा किंचित अधिक कठोर झाले होते. या प्रकरणात त्यांच्यावर उपचार करण्यात स्थानिक डॉक्टरांना देखील यश आले नाही.
या घटनेच्या नंतर एके दिवशी सत्यनारायण यांनी चॉकलेट आणि गुलाबाची फुले अशा भेटवस्तू बनवून वाटण्यास सुरुवात केली जेव्हा यामागील कारण त्यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी आपण साईबाबांचे अवतार असल्याचे सर्वाना सांगितले. तसेच त्याच क्षणी स्वतःच्या नावापुढे त्यांनी साई हा शब्द देखील जोडून घेतला. लोकांच्या विचारसरणीत सनातन धर्माची विचारधारा समाविष्ट करण्यात त्यांना यश आले होते.
सत्य साई बाबा यांनी आपल्या हयातीत अनेक चमत्कार केल्याचे म्हंटले जाते. म्हणूनच त्यांनी काही वेळा सुपर ह्युमन म्ह्णून देखील संबोधले जात. लोकांमध्ये फिरताना आपले चमत्कार दाखवत कधी बहुमूल्य हार, अंगठी, दागिने किंवा अंगारा असे सगळे जादुई पद्धतीने प्रस्तुत करणे अनेकदा चर्चच्या आले होते यावरूनच त्यांना टीकेचा देखील सामना करावा लागला होता.
1944 मध्ये सत्य साई बाबा यांनी पुट्टपर्थी गावकऱ्यांसाठी एका मंदिराची उभारणी केली होती.आध्यात्मिक बाबींच्या सोबतच सामाजिक कार्यात देखील सत्य साई बाबांचा मोलाचा वाटा होता, मोफत हॉस्पिटल, क्लिनिक, पाणपोई, ऑडिटोरियम, आश्रम, शाळा इत्यादींची बांधणी करून त्यांचा गोरगरिबांना वापर करायला दिल्याने अनेकदा त्यांना देवाचे रूप मानले जायचे.
1963 मध्ये सत्य साई बाबा यांना 4 ववेळा हृदयविकाराचे झटके आले होते. मात्र काहीच काळाने त्यांच्या प्रकृतीमध्ये स्थैर्य आले होते. यानंतर त्यांनी एका प्रवचनातून आपला मृत्यू झाला तरी कर्नाटकात आपण प्रेमा साईं बाबा यांच्या रूपात पुन्हा जन्म घेऊ असा दावा केला होता.
2011 साली मार्च मध्ये सत्य साई बाबा यांना श्वसनात त्रास होऊ लागल्यावर पुट्टपर्थी येथील शांतिग्राम श्री सत्य साई सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. यानंतर एकाच महिन्यात त्यांची अवस्था आणखीनच बिकट झाल्याने 24 एप्रिल, 2011 मध्ये वयाच्या 85व्या वर्षी त्यांचे निधन झाले