
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 340 वा पालखी सोहळा (Sant Tukaram Palkhi 2025) 18 जून 2025 रोजी देहू येथून प्रस्थान करणार असून, हा पालखी सोहळा 19 दिवसांचा पायी वारीचा प्रवास करत 6 जुलै रोजी पंढरपूर (Pandharpur Wari 2025) येथे पोहोचणार आहे. या दिवशी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2025) असून, वारकरी संप्रदायासाठी तो अतिशय पवित्र दिवस मानला जातो. या पालखीत संत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवण्यात येतात आणि हा सोहळा श्रद्धा, भक्ती आणि शिस्तीचे प्रतीक मानला जातो. पालखी 10 जुलै पर्यंत पंढरपुरात मुक्कामी राहणार असून, भाविकांना चार दिवसांचे दर्शन व धार्मिक कार्यक्रम अनुभवण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर पालखी 21 जुलै 2025 रोजी पुन्हा देहू येथे परतणार आहे.
पंढरपूर वारी म्हणजे काय?
पंढरपूर वारी ही जगातील सर्वात मोठ्या आणि शिस्तबद्ध धार्मिक यात्रांपैकी एक आहे. हजारो वारकरी पायी चालत विठ्ठलाचे नामस्मरण करत या वारीत सहभागी होतात. अभंग, कीर्तन, आणि भक्तीचा उत्सव हे या यात्रेचे मुख्य आकर्षण असते. (हेही वाचा, Pandharpur Wari 2025 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Time Table: आषाढी वारी मध्ये माऊलींच्या पालखी प्रस्थान कधी? जाणून घ्या संत ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण वेळापत्रक)
संत तुकाराम महाराज पालखी 2025- महत्वाच्या तारखा
कार्यक्रम | तारीख |
देहू येथून पालखीचे प्रस्थान | 18 June 2024 |
पंढरपूर आगमन (आषाढी एकादशी) | 6 July 2024 |
पंढरपूर मुक्काम समाप्त | 10 July 2024 |
देहू येथे पालखीचे आगमन | 21 July 2024 |
प्रमुख विधी आणि मार्गातील बदल
यंदाही पारंपरिक गोल रिंगण आणि उभं रिंगण या श्रद्धापूर्वक साजऱ्या होणाऱ्या विधींमध्ये भाविक, घोडे आणि पालखी एकत्र येईल.
2024 मधील खास बदल:
- चंद्रमानानुसार पंचांगात झालेल्या बदलामुळे यंदा अंथुर्णे येथील मुक्काम रद्द करण्यात आला आहे.
- पालखी लोणी काळभोर पार केल्यानंतर शिंडवणे चौकात एक तास विश्रांती घेणार आहे.
पालखीचे व्यवस्थापन कोण करत आहे?
2025 च्या पालखी सोहळ्याचे संयोजन पुढील मंडळींकडे देण्यात आले आहे: गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, दिलीप महाराज मोरे हे पालखीचे व्यवस्थापन करतील, अशी माहिती देहू संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी दिली आहे.
सुरक्षा आणि नियोजन
पालखी मार्ग अगदी ठरवून आखलेला असून, औषधोपचार, अन्न व पाण्याची सुविधा, आराम स्थानके यांची पुरेशी व्यवस्था प्रत्येक ठिकाणी करण्यात आली आहे. हजारो भाविकांची उपस्थिती लक्षात घेता सुरक्षा आणि शिस्तीला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.