
महाराष्ट्रामध्ये मोठी संत परंपरा आहे. यंदा 7 जुलै दिवशी आषाढी एकादशीचा सोहळा रंगणार आहे. या आषाढी एकदशी निमित्त वैष्णवांचा मेळा आता मजल- दरमजल करत पंढरपूरला निघण्याची तयारी करत आहे. यंदाच्या जारी आषाढी एकादशीच्या वेळापत्रकानुसार, महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर यांची पालखी 19 जून दिवशी रात्री 8 वाजता प्रस्थान ठेवणार आहे. संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने प्रवास करणार आहे. ह्जारो वारकरी संत तुकराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालखी सोबत मुखी नामस्मरण करत अखंड चालत असतात. या पालखीच्या प्रवासातही अनेक भाविक दर्शनाला मोठी गर्दी करतात मग जाणून घ्या यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रवास कोणत्या दिवशी कुठे असणार आहे.
पुणे, सासवड,जेजुरी, लोणाद, फलटण,नातेपुते,माळशिरस,वेळापूर, शेगाव आणि वखारी ते पंढरपूर असा प्रवास माऊलींच्या पालखीचा प्रवास असतो. संत ज्ञानेश्वर यांचा जन्म 1275 साली पैठण येथील आपेगाव मध्ये झाला होता. ज्ञानेश्वर हे संत, कवी, तत्त्वज्ञ, योगी होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव या त्यांच्या रचना आहेत. अवजड प्राकृत भाषेतील रचना मराठीत सोप्या भाषेत नागरिकांसाठी त्यांनी खुल्या केल्या. त्यांनी वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये पोहचवण्यासाठी काम केलं. Pandharpur Wari 2025 Sant Tukaram Maharaj Palkhi Time Table: संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा कसा असेल? पहा रिंगण सोहळा, मुक्कामांचा संपूर्ण कार्यक्रम.
संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी 2025 चे वेळापत्रक
ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा परतीचा प्रवास 10 जुलै दिवशी सुरू होणार आहे. 21 जुलैला पालखी आळंदी मध्ये नगरप्रदक्षिणा करणार आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या पालखी कधी आणि कशी सुरू झाली?
पूर्वी नियमित आधी तुकोबांची आणि त्यानंतर माऊलींची पालखी पंढरपूरला प्रस्थान करत असे. मात्र दरम्यान तुकोबांच्या वंशजांमध्ये मालकी हक्कावरून आणि सेवेच्या प्रश्नावरून वाद सुरू झाला. अशावेळी माऊलींचे भक्त हैबतबाबा आरफळकर यांनी ज्ञानोबांची स्वतंत्र पालखी आळंदीहून नेण्यास सुरूवात केली.