
हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमेला संत रविदास (Sant Ravidas) यांची जयंती साजरी केली जाते. यंदा ही जयंती 16 फेब्रुवारी दिवशी आहे. त्यांचा जन्म माघ पौर्णिमेला झाला असल्याची आख्यायिका आहे. संत रविदास यांचे अनुयायी या दिवशी एकत्र जमून भजन करतात. त्यांना रैदासजी किंवा संत रोहिदास (Sant Rohidas) म्हणून देखील ओळखले जाते. त्यांचे आई-वडील चर्मकार होते.
भगवंताच्या भक्तीमध्ये रमलेल्या संत रविदासजींनी आपली सामाजिक व कौटुंबिक कर्तव्येही उत्तम प्रकारे पार पाडली. त्यांनी आपापसात प्रेम करायला शिकवले आणि त्याच प्रकारे त्यांनी भक्तीचा मार्ग अवलंबला पुढे त्यांची ओळख संत रविदास म्हणून सर्वत्र झाली. त्यांची शिकवण आजही प्रेरणादायी आहे. संत रविदास जयंतीनिमित्त त्यांचे अनमोल विचार जाणून घेऊया.
- मन चंगा तो कठौती में गंगा

- करम बंधन में बन्ध रहियो, फल की ना तज्जियो आस
कर्म मानुष का धर्म है, सत् भाखै रविदास

- रविदास जन्म के कारनै, होत न कोउ नीच,
नर कूँ नीच करि डारि है, ओछे करम की कीच

गुरु रविदास यांची 41 भक्तीगीते आणि कवितांचा समावेश शीख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमध्ये करण्यात आला आहे. असे म्हणतात की मीराबाई गुरु रविदासांना आपले आध्यात्मिक गुरू मानत होत्या. संत गुरू रविदासांच्या जयंतीनिमित्त, त्यांचे चित्र असलेल्या मिरवणुका रस्त्यावर येतात, विशेषत: सीर गोवर्धनपूरमध्ये, जे अनेक भक्तांसाठी केंद्रबिंदू बनतात. गुरु रविदासांना समर्पित मंदिरांमध्ये शीख धर्मग्रंथांचे पठण केले जाते आणि प्रार्थना केल्या जातात.