Pandharpur Wari 2019 Mauli Ringan Schedule: संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी लाखो वारकर्यांसह आता पंढरीला निघाली आहे. वारकर्यांच्या या सोहळ्यामधील आकर्षण म्हणजे रिंग़ण असते. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण आज (3 जुलै) दिवशी पार पडणार आहे. संध्याकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास चांदोबाचा लिंब येथे हे रिंगण पार पडेल. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं यंदाचं 188 वं वर्ष आहे. आज ज्ञानोबांची पालखी लोणंद ते तरडगाव पर्यंत प्रवास करणार आहे. काल नीरा नदीमध्ये ज्ञानोबांच्या पादूकांना स्नान घालण्यात आले होते. आज लाखो वारकर्यांच्या उपस्थितीमध्ये पहिलं रिंग़ण पार पडणार आहे. वारीमध्ये सहभागी वारकर्यांसोबतच इतर भाविकांनाही या सोहळ्याचं आकर्षण असल्याने त्यांचीही हजेरी पहायला मिळणार आहे. पहा माऊलींच्या पालखी 2019 चं संपूर्ण वेळापत्रक
ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रिंगण वेळापत्रक
ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात उभे आणि गोल रिंगण पार पडते. पहा या रिंगण सोहळ्याचे वेळापत्रक
- पहिले उभे रिंगण - 3 जुलै 2019 - चांदोबाचा लिंब
- पहिलं गोल रिंगण - 7 जुलै 2019- सदाशिवनगर
दुसरं गोल रिंगण - 8 जुलै 2019 - खुडुस फाटा
- तिसरं गोल रिंगण - 9 जुलै 2019 - ठाकूरबुवाची समाधी
- दुसरं उभे रिंगण - 10 जुलै 2019 - बाजीरावाची विहिर
- चौथं गोल रिंगण - 10 जुलै 2019 - बाजीरावाची विहिर
- तिसरं उभं रिंगण - 11 जुलै 2019 - पादुकेजवळ
यंदा 12 जुलै दिवशी आषाढी एकादशीचा सोहळा आहे. त्यादिवशी देशा-परदेशातील भक्त पंढरपुरामध्ये येऊन विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात.