Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2019 Schedule: आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) दिवशी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी महाराष्ट्रभरातून 250 किलोमीटरची पायपीट करून येतात. देहूमधून तुकारामांची तर आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी प्रस्थान ठेवते. यंदा 25 जून दिवशी ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून प्रस्थान ठेवेल तर 24 जून दिवशी संत तुकारामांची पालखी प्रस्थान ठेवणार आहे. पहा गोल रिंगण, उभं रिंगण कधी असेल?
पहा ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कशी करणार प्रवास
आळंदीहून वारकरी ज्ञानेश्वरांची पालखी घेऊन पंढरपूरच्या प्रवासाला निघातात.
यंदादेखील हा प्रवास 25 जूनपासून सुरू होणार आहे. पुणे, सासवड,जेजुरी, लोणाद, फलटण,नातेपुते,माळशिरस,वेळापूर, शेगाव आणि वखारी ते पंढरपूर असा प्रवास करणार आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी 2019 वेळापत्रक जाहीर
संत ज्ञानेश्वर यांचा जन्म 1275 साली पैठण येथील आपेगाव मध्ये झाला होता. ज्ञानेश्वर हे संत, कवी, तत्त्वज्ञ, योगी होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव या त्यांच्या रचना आहेत. अवजड प्राकृत भाषेतील रचना मराठीत सोप्या भाषेत नागरिकांसाठी त्यांनी खुल्या केल्या. त्यांनी वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये पोहचवण्यासाठी काम केलं.
महाराष्ट्राला आता 700 वर्षांची वारकरी संप्रदयाची परंपरा आहे.