
कुणाच्या मनापर्यत पोचण्याचा रस्ता हा पोटाच्या मार्गे जातो आणि हे विधान भारतीयांच्या (India) बाबतीत अगदीचं खरं आहे. सण उत्सव (Festival) म्हंटलं की आपल्याकडे खाण्यापिण्याची चंगळमंगळचं. किंबहूना आपल्याकडे सणासुदीचे दिवस आलेत की कुठल्या पदार्थाचा बेत आखायचा हा प्रश्न गृहिणींना पडतो. आता श्रावणाला सुरुवात झाली आणि सणांची चाहूल लागली आहे. लवकरच रक्षाबंधन (Rakshabandhan), गणोशोत्सवासारखे (Ganeshotsav) सण पुढे आहेत. तरी येणाऱ्या 11 ऑगस्टला नारळीपौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन निमित्त आम्ही तुमच्यासाठी काही खास पदार्थांची मेजवानी घेवून आलेलो आहोत. (हे ही वाचा:- Gatari 2022 Special Non-veg Recipes: गटारीसाठी स्पेशल 5 अस्सल महाराष्ट्रीयन मांसाहारी पदार्थ, व्हिडीओ पाहून तोंडाला सुटेल पाणी, पाहा व्हिडीओ)
1. शाही पुलाव
शाही पुलाव बनवण्यास अगदी सोपा आणि खाण्यास पौष्टीक आहे. रक्षाबंधन म्हणजे मुळात लगबगीचा दिवस आणि त्यात कमी कमी वेळात शाही पुलावचा बेत आखणं अगदी सोपं आहे. हे बनवण्यासाठी फार वेळ तसेच साहित्याची गरज नाही, घरी असलेल्या सामग्रित तुम्ही सहज शाही पुलाव बनवू शकता.
2. आलू पुरी
सणासुदीचा दिवस म्हंटलं की आलु पुरी म्हणजे सर्वोत्तम पदार्थ हे म्हणणं नाकारता येणार नाही कारण पोटभर खाता येईल असा हा पदार्थ आहे. तसेच लांब काळासाठी हा टिकवण्याच्या बाबतीतही आलू पुरी हा एक सर्वोत्तम पदार्थ आहे.
3. दही भल्ला
दही भल्ला ही तुमच्या घरी आलेल्या प्रत्येक पाहूण्याला किंवा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आवडेल असा पदार्थ आहे. रक्षाबंधनच्या सणाला दही भल्ला एक उत्तम स्टारटर म्हणून सर्व्ह करु शकता.
4. काळ्या चण्याची भेळ
काळा चना भेळ ही बनवण्यास सोपी आणि प्रोटिनयुक्त पदार्थ म्हणजे हेल्थ कॉन्शस पाहूण्यासाठी हा एक उत्तम बेत ठरु शकतो. काळा चना भेळ तुम्ही सॅलड किंवा चाट म्हणून सर्व्ह करु शकता.
5. केसर खीर
गोड पदार्थाविना कुठलाही सण समारंभ अपूर्णचं. मग या रक्षाबंधनला आखा खास केसर खीरचा बेत. केसर खीर ही लहान्या पासून मोठ्यांपर्यत सगळ्यांना आवडेन असा पदार्थ आहे.