
नारळी पौर्णिमेचा (Narali Purnima) सण म्हणजे रक्षा बंधनाचा (Raksha Bandhan) दिवस. अनेक बहिण भावंडांमधलं नातं हे 'तुझं-माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना' असंच असतं. पण वर्षातला हा रक्षा बंधनाचा एक दिवस सारे हेवेदावे विसरून त्यांचं नातं दृढ करणारा असतो. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून आजन्म रक्षण करण्यासाठी वचन मागते. यंदा देखील जगभरात कोविड 19 चं संकट अद्यापही घोंघवत आहे. मग अशा काळात तुम्ही भाऊ-बहीण एकमेकांना भेटणं शक्य नसेल तर या रक्षबंधन सणाचा आनंद सोशल मीडीयातून साजरा करा. व्हर्च्युअल भेटून आणि दिवसाची सुरूवात रक्षाबंधनाच्या शुभेच्छा व्हॉट्सअॅप स्टेट्स (WhatsApp Status), फेसबूक मेसेजेस (Facebook Messages) द्वारा शेअर करत द्विगुणित करा. त्याकरिता लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेले हे रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देणारे मराठमोळे मेसेजेस, Wishes, GIFs, WhatsApp Status, HD Images, Greetings, Photos शेअर करायला विसरू नका.(नक्की वाचा: Raksha Bandhan 2021 Messages in Marathi: रक्षाबंधन सणानिमित्त मराठी Wishes, Greetings, Images शेअर करुन साजरी करा यंदाची राखीपौर्णिमा!).
रक्षा बंधन हा श्रावण महिन्यातील महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. यादिवसाच्या निमित्ताने घराघरात गोडाचे पदार्थ बनवले जातात. बहीण भावाला ओवाळून, त्याच्या हातावर राखी मागून सुखी, निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करते. या दिवशी बहीणीला भाऊ देखील ओवाळणी देतो. तिचं रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही देतो.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
सण आज बहिण-भावाच्या दृढ नात्याचा
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

बहीण भावाच्या प्रेमाचं नातं अतुट
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

थोडी लढणारी, थोडी भांडणारी
थोडी चिडणारी, थोडी काळजी घेणारी
थोडी मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर रक्षाबंधन सणाची शान असते
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

हे बंध स्नेहाचे
हे बंध रक्षणाचे
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

अजूनही सण समारंभांवर कोविड 19 चं सावट आहे त्यामुळे यावर्षी देखील घरातच आणि मोजक्या स्वरूपातच सण साजरा करण्यामध्ये खरा आनंद आहे. तुम्ही एकमेकांपासून दूर असाल तर डिजिटली आणि व्हर्च्युअल माध्यमातून या सणाचं सेलिब्रेशन करायला विसरू नका. एकमेकांना घट्ट बांधून ठेवण्यासाठी सण हा एक दुवा आहे त्यामुळे ती मज्जा लूटायला विसरू नका.