Raksha Bandhan Marathi Messages: श्रावण पौर्णिमा हा दिवस सर्वत्र रक्षाबंधन म्हणून साजरा केला जातो. प्रदेशानुसार सणाचे नाव, साजरी करण्याची पद्धत काहीशी वेगळी असली तरी त्यामागील उद्देश, भाव सारखाच आहे. यंदा रविवार, 22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण आला आहे. सुट्टी असल्याने बहिणी-भावांना एकत्र येऊन सण नक्कीच साजरा करता येईल. रक्षाबंधन सणानिमित्त बहिण-भावाला शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश, Messages, Wishes, Greetings, Images घेऊन आलो आहोत. ते तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर करुन राखीपौर्णिमेचा सण खास करा.
भावा-बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा, कर्तव्यांची जाणीव करुन देणारा आणि भरभरुन आनंद घेऊन येणारा असा हा सण आहे. सर्व भारतभर हा अगदी उत्साहाने साजरा केला जातो. बहिण भावाचे औक्षण करुन राखी बांधते. गोड पदार्थ भरवते आणि भाऊ त्याबदल्यात बहिणींना छानसं गिफ्ट देतो किंवा ओवाळणी देतो.
रक्षाबंधन शुभेच्छा संदेश:
तुझ्या माझ्या नात्यात
एक विलक्षण गोडवा आहे
कितीही भांडलो, रुसलो,
फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे
यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रेशमी धाग्यात रंग आहे प्रेमाचा
वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा
यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे
रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा भाऊ
तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
या दिवशी नारळी पौर्णिमेचा सणही साजरा केला जातो. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करुन पूजा केली जाते. मासेमारी हा कोळीबांधव प्रमुख व्यवसाय सुमद्रावर अवलंबून असल्याने ही पूजा करणे पूर्वापार चालत आले आहे. असो. यंदाची राखीपौर्णिमा बहिण-भावांच्या सहवासात साजरी करा. रक्षाबंधनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!