Pune Ganeshotsav 2022 Regulations: यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांनी जारी केली मंडळांसाठी नियमावली, घ्या जाणून
Ganpati (Photo Credit: Pixabay)

गेली दोन वर्षे जग कोरोनाच्या सावटाखाली होते. यामुळे देशात अनेक सण-उत्सव उत्साहाने साजरे करता आले नाहीत. मात्र यंदा परिस्थिती आटोक्यात आहे, यामुळे गणेशोत्सव, दही हंडी हे सण उत्साहाने, जल्लोषात साजरे होणार आहेत. यासाठी राज्य शासनामार्फत गणेशोत्सव मंडळांना सहकार्य करण्यात येणार असल्याचेही सरकारने सांगितले आहे. आता अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे, अशात हा सण कोणत्याही निर्बंधांशिवाय साजरा होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकाडून गणेशोत्सव उत्सवासाठी नियमावाली जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात पुणे व मुंबई इथला गणेशोत्सव लोकप्रिय आहे. पुण्यात दगडूशेट तसेच पाच मानाच्या गणपतींमुळे गणेशोत्सवावेळी दरवर्षी शहरात भाविकांची गर्दी दिसून येते. हीच गर्दी लक्षात घेता पुणे पोलिसांनी जवळपास 39 नियम आणि अटी घातल्या आहेत व त्यांचे पालन करावे लागणार आहे.

  • गणपती स्थापने पूर्वीच सर्व मंडळांनी पोलीस परवाना घेणे बंधनकारक आहे.
  • पोलीस परवाना अर्ज स्विकृती त्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांचे अधिकारीतेत एक खिडकी योजना मार्फत स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.-
  • वर्गणी सक्तीने अगर वाहने अडवून जमा करु नये.
  • गणपती मंडप सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वानुसार रस्त्याचा 1/3 भाग उपयोगात आणून बांधावा. (हेही वाचा: 31 जुलैपासून ऑटो-टॅक्सी चालकांचा बेमुदत संप; सर्वसामान्यांना बसणार फटका, जाणून घ्या कारण)
  • मंडप बांधण्यापूर्वी गणेशोत्सव परवाना प्राप्त करावा.
  • मंडप व गणपती स्थापनेचे आसन मजबुत असावे. तसेच श्री मुर्तीचे पाऊस व आगीपासून संरक्षणाची काळजी घ्यावी.
  • मुर्तीची स्थापना योग्य उंचीवर असावी.
  • गणेश मुर्तीची उंची मर्यादीत असावी, गणेश मुर्ती पारंपारिक असल्यास देखाव्याच्या उंचीची मर्यादा मर्यादीत असावी.
  • कार्यक्रमाच्या ठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना उपलब्ध केलेली असावी. वाळुच्या बादल्या भरून ठेवाव्यात.
  • सजावटीमध्ये हॅलोजन सारखे प्रखर दिवे लावण्याचे टाळावेत. प्रेक्षक अथवा सुरक्षा रक्षकांच्या डोळयांवर प्रखर प्रकाश पडणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • मंडपातील रोषणाई व विद्युतीकरणाचे काम प्रमाणपत्र असलेल्या तज्ञ वायरमनकडून करुन घ्यावे. तसेच विद्युत मंडळाचे अधिका-यांकडून तपासणी करुन घ्यावी.
  • विद्युत प्रवाह खंडीत झाल्यास जनरेटर, बॅट या उपलब्ध ठेवाव्यात.
  • उत्सवामध्ये व मिरवणुकीमध्ये करण्यात येणा-या देखाव्याची माहिती अगोदर संबधित ठाण्यात कळविणे आवश्यक आहे.
  • वादग्रस्त ठरतील अशा विषयावर कार्यक्रम अगर देखावे/सजावटी सादर करु नयेत.
  • संपूर्ण उत्सवाचे काळात मंडळाच्या ठिकाणी होणा-या कार्यक्रमाची यादी व रुपरेषा पोलीसांना आगाऊ कळवावी.
  • ध्वनिक्षेपकाचा वापर सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटीनुसार करावा तसेच ध्वनिक्षेपकाची मर्यादा 2 ओहम व 5000 आर. एम. एस. वॅट पेक्षा जास्त क्षमतेची असू नये.
  •  गणेश विसर्जन मिरवणूक विहित वेळेत संपवावी.
  • मिरवणुकीत बैलगाडी किंवा इतर गाड्यांचा वापर थांबवावा.
  • मिरवणुकीच्या दरम्यान दोन मंडळांमध्ये अंतर ठेऊ नका.
  • मिरवणुकीच्या वेळी प्रत्येक मंडळाला जास्तीत जास्त दोन बॉक्स कमानी उभारता येतील. त्याची उंची 20 फुटांपेक्षा जास्त नसू नये. इ.