Propose Day 2020 Gift Ideas: तुमच्या व्हॅलेन्टाईनला प्रपोज करताना गिफ्ट म्ह्णून देऊ शकाल 'या' हटके गोष्टी; जाणून घ्या स्वस्तात मस्त आयडीयाज
Propose Day 2020 (Photo Credits: Unsplash)

Propose Day Best Gift Ideas: असं म्हणतात की प्रेम ही अत्यंत अव्यक्त भावना आहे, जी बोलून दाखवण्यापेक्षा कृतीतून व्यक्त केली तर तुमच्या प्रिय व्यक्तीला आणखीन खास फील करून देत असते. पण तरीही आपल्या प्रिय व्यक्तीने एकदा का होईल अगदी स्पष्टपणे आपल्या प्रेमाची कबुली द्यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते, काय म्हणता? तुम्ही सुद्धा यंदा तुमच्या प्रिय व्यक्तीला तुमचं तिच्या/त्याच्या वर किती प्रेम आहे सांगण्याचा प्लॅन करताय? तर मग येत्या व्हॅलेन्टाईन वीक (Valentine Week 2020) मधील प्रपोज डे (Propose Day)  चा आयता चान्स अजिबात दवडू नका. दरवर्षी प्रमाणे 7 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या या प्रेमाच्या आठवड्यात दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा केला जातो. यंदा याच दिवशी तुम्ही सुद्धा तुमच्या दिल की बात तुमच्या व्हॅलेंटाईनला सांगू शकता. प्रपोज करायचं म्हणजे एखाद छान गिफ्ट (Gift) पण द्यायला हवं, नाही.. काय द्यावं याची चिंता करू नका अगदी तुमच्या बजेट मध्ये बसेल आणि तुमचं इम्प्रेशन वाढवेल अश्या काही गिफ्ट आयडीयाज आम्ही तुम्हाला सुचवणार आहोत..

चला तर मग पाहुयात.. प्रपोज डे स्पेशल गिफ्ट आयडीयाज..

फ्लॅश बॅक कार्ड्स

तुम्ही फार काळापासून एकमेकांना ओळखत असाल तर, तुमच्या आतापर्यंतच्या आठवणींना उजाळा देणारे काही कार्ड्स तुम्ही पार्टनरला गिफ्ट देऊ शकता. तुमच्या पहिल्या फोटोपासून ते अगदी अलीकडच्या एकत्र फोटोची प्रिंट काढून त्याची एक माळ बनवून बॉक्स मध्ये ठेवून गिफ्ट देण्याच्या या पर्यायाचा नक्की विचार करता येईल. एक टीप म्हणजे गिफ्ट देताना एक कार्ड रिकामे ठेवा आणि जेव्हा तुम्ही फायनली प्रपोज कराल त्या क्षणाला कॅप्चर करून तो फोटो त्या माळेत जोडा.

ट्रीप कुपन्स

यंदा अनायासे प्रपोज डे च्या दिवशी शनिवार येत असल्याने एखादी छोटीशी वन डे ट्रीप तुम्ही प्लॅन करून त्याचे कुपन्स आधीच तुमच्या प्रिय व्यक्तीला गिफ्ट देऊ शकता. बेस्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही दोघेच गेल्यावर तिथेच तुमच्या प्रेमाची कबुली द्या.

कपल रिंग्स

ऐकायला ही गोष्ट जितकी कॉमन वाटते तितकीच स्वतःच्या पार्टनरने केल्यावर रोमँटिक वाटू शकते. तुमच्या दोघांच्या नावाचे इनिशियल्स असणारी एखादी छोटी प्रॉमिस रिंग तुम्ही गिफ्ट देऊ शकाल. जर का गुढघ्यावर बसून तुम्ही अगदी फिल्मी स्टाईलने प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर रिंग इज मस्ट!

डायरी

आजकाल बाजारात आलेल्या अगदी कुल कस्टमाईझ्ड डायरीज तुम्ही तुमच्या पार्टनरला गिफ्ट करू शकता. प्रपोज करतेवेळी डायरीच्याआतील बाजूस तुमची जी काही प्रपोजल लाईन असेल ती लिहून त्याखाली हो नाही चा पर्याय तुम्ही चेक बॉक्ससारखा लिहू देऊन शकाल. इन्ट्रोव्हर्ट लोकांसाठी तर हा अगदी बेस्ट पर्याय आहे.

लव्ह नोट्स

जर का तुम्हाला काही वेळ काढून थोडी मेहनत करणे शक्य असेल तर लव्ह नोट्स किंवा लव्ह जरचा पर्याय नक्की निवडता येईल. तुम्ही ज्या व्यक्तीला प्रपोज करणार आहेत ती वक्ती तुम्हाला का आवडते हे लिहून देऊन या नोट्स बनवा त्या एका क्युट जार मध्ये ठेवा आणि गिफ्ट म्ह्णून तुमच्या पार्टनरला द्या.

साधारणतः गिफ्ट द्यायचं तर काहीतरी युजफूल देऊ असं म्हणतील जातं तुम्हीही हाच विचार करत असाल तर एखाद टीशर्ट, ज्वेलरी वैगरे हे पर्याय सुद्धा तुम्हाला निवडता येतील. मात्र प्रपोज करताना थोडं हटके गिफ्ट द्यायचं तुमच्या मनात असेल तर एकदा वरील सर्व ऑप्शन्सचा विचार नक्की करा. ऑल द बेस्ट!