Promise Day 2019: व्हेलेंटाईन वीक मधील 'प्रॉमिस डे'चं सेलिब्रेशन का आणि कसं असतं?
Happy Promise Day (Photo Credits: File Image)

Valentine’s Day 2019: सध्या सर्वत्र प्रेमाचे वारे वाहत आहे. फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा हा व्हेलेंटाईन वीक (Valentine Week) म्हणून साजरा केला जातो. 7-14 फेब्रुवारी या आठवड्याभराच्या सेलिब्रेशनमध्ये तरूणाई प्रत्येक दिवशी एक वेगळा दिवस सेलिब्रेट करते. प्रामुख्याने तरूण प्रेमी जोडप्यांमध्ये 'व्हेलेंटाईन डे' (Valentine’s Day)च्या सेलिब्रेशनची क्रेझ अधिक असते. 11 फेब्रुवारी हा दिवस 'प्रॉमिस डे' (Promise Day 2019 )म्हणून साजरा केला जातो. Valentine’s Day 2019: Rose Day ते Valentine’s Day पहा कसं असेल हे आठवड्याभराचं Romantic सेलिब्रेशन

'प्रॉमिस डे' या नावातच या दिवसाचं महत्त्व आहे. या दिवशी प्रेम करणार्‍या व्यक्ती त्यांच्या साथीदारांना एकमेकांना कायम साथ देण्याची कबुली देतात, त्यांचं प्रेम व्यक्त करताना चांगल्या वाईट काळातही एकमेकांसोबत राहणार हे प्रॉमिस या निमित्ताने दिलं जातं. Promise Day 2019: प्रॉमिस डे च्या दिवशी प्रथम स्वत:ला द्या ही Promises, नाते कधीच तुटणार नाही

तुम्हांला 'प्रॉमिस डे' ही कल्पना एक दिवस म्हणून पटत नसली तरीही तुमच्या साथीदाराला प्रेमासोबतच नात्याचा विश्वास देणं ही संकल्पना म्हणून याकडे पहा. कारण रिलेशनशिप दीर्घ काळ टिकवायचं असेल तर त्याचा पाया मजबूत असायला आहे. 'विश्वास' हाच तुमच्या नात्याचा पाया असेल तर तो मजबूत करणंही तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे काही खास मेसेज, गिफ्टच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही 'प्रॉमिस डे' खास बनवू शकता.

संत व्हेलेंटाईन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हेलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातो. यासिवशी प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या साथीदाराचा दिवस थोडा स्पेशल करण्यासाठी प्रयत्न करत असते. मग यंदा तुमचा व्हेलेंटाईन डे चा प्लॅन ठरला का?