Valentine’s Day 2019: Rose Day ते Valentine’s Day  पहा कसं असेल हे आठवड्याभराचं Romantic सेलिब्रेशन
Valentine Week 2019 Calendar (Photo Credits: Pixabay)

Valentine Week 2019 Calendar: जगभरातील 'लव्हर्स' ज्या खास सेलिब्रेशनची वाट पाहत असतात तो 'व्हॅलेंटाईन' डे (Valentine’s Day) आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामध्ये आठवडाभर प्रत्येक दिवशी एक खास सेलिब्रेशन असतं. 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे असला तरीही त्याचं सेलिब्रेशन 7 फेब्रुवारी पासून सुरु होतंय, मग यंदाच्या तुमच्या व्हेलेंटाईनसाठी हा वीक स्पेशल बनवायचा असेल तर पहा रोझ डे(Rose Day)  पासून व्हेलेंटाईन डे (Valentine’s Day) पर्यंत कोणता दिवस कधी आहे? त्यासाठी खरेदी आणि सरप्राईज आजपासूनच प्लॅन करायला सुरुवात करा.

कस असेल Valentine’s Day 2019 चं सेलिब्रेशन कॅलेंडर

7 फेब्रुवारी 2019 - रोझ डे

8  फेब्रुवारी 2019 - प्रपोझ डे

9  फेब्रुवारी 2019  - चॉकलेट डे

10 फेब्रुवारी 2019 - टेडी डे

11  फेब्रुवारी 2019- प्रॉमिस डे

12 फेब्रुवारी 2019  - हग डे

13  फेब्रुवारी 2019  - किस डे

14 फेब्रुवारी 2019 - व्हॅलेंटाईन डे

Valentine Week 2019 ( Photo Credits: File Photo)

व्हॅलेंटाईन डे च्या या वीक सेलिब्रेशनची तरुणाईमध्ये खास क्रेझ असते. प्रत्येक दिवशी एक नवं गिफ्ट देऊन तो दिवस सेलिब्रेट केला जातो. Saint Valentine यांच्या स्मरणार्थ या आठवड्याभराचं सेलिब्रेशन असतं. इसवि 270 मध्ये रोममध्ये प्रेमी युवकांना आयुष्यभरासाठी एकमेकांना सोबत राहता यावं यासाठी संत व्हॅलेंटाईन यांनी मदत केली होती त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आज ग्लोबलायझेशनच्या काळात रीती भाती किंवा धर्म यांच्या पलीकडे जाऊन भारतामध्येही प्रेमी युगुल उत्साहाने या सेलिब्रेशन मध्ये सहभागी होतात.