Promise Day 2019: प्रॉमिस डे च्या दिवशी सर्वात आधी स्वत:ला द्या ही Promises,म्हणजे नातं होईल अधिक मजबूत!
Promise Day (Photo Credits- Twitter)

Valentine’s Day 2019: व्हेलेंटाईन वीक (Valentine Week) ची सध्या सगळीकडेच धूम आहे. त्यामुळे सर्वत्र प्रेमाचे वातावरण दिसून येते. व्हेलेंटाईन वीक  मधील पाचवा दिवस म्हणजेच 11 फेब्रुवारी रोजी असणारा प्रॉमिस डे (Promise Day) . व्हेलेंटाईन वीक  (Valentine Week) मध्ये प्रत्येक दिवशी एक खास दिवस साजरा केला जातो.  प्रॉमिस डे  दिवशी प्रेमवीर खऱ्या प्रेमाची साक्ष देत एकमेकांना आयुष्यभर साथ देईन असे वचन देतात. त्यामुळे दिलेले वचन हे फक्त या दिवशीच पाळायचे नसते तर आयुष्याच्या पदोपदी आपल्या पार्टनरला दिलेल्या वचनाचे पालन असते.

तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रॉमिड डेच्या दिवशी काही वचने देण्यापूर्वी तुम्ही स्वत:ला आधी 'ही' वचने द्या. त्यामुळे तुमचे नाते आयुष्यभर टिकून राहील आणि आपल्या पार्टनरच्या चेहऱ्यावर तुम्हाला नेहमी हसु आलेले पाहता येईल.

आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा भार दुसऱ्यावर टाकू नका

आयुष्यात एक गाठ नेहमी बांधून ठेवा की, तुमचा पार्टनर तुमच्या काही इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ असेल काही वेळेस तर त्याच्यावर जबरदस्ती करु नका. पण प्रयत्न करण्याचे ही सोडू नका.

नात्याला सन्मान देण्याचे वचन

सध्या तरुणाईमध्ये लव्ह रिलेशनशिप्सचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आपले पूर्ण लक्ष आपल्या पार्टनरकडे लागून राहते. त्यामुळे काही वेळेस घरातील नात्यांकडे ही दुर्लक्ष होते. मात्र असे करु नका सर्वंच नात्यांना सन्मान द्या.

नात्यात Adjustment करण्यास शिका

जर कोणत्याही नात्यामधून तुम्हाला आनंद किंवा यश मिळते त्यावेळची जबाबदारी तुमच्यावरच असते.त्यामुळे नाते कोणतेही असो आई-मुलाचे किंवा प्रियकराचे प्रत्येक नात्यात Adjustment करणे गरजेचे आहे.

तर यंदाच्या प्रॉमिस डे च्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला आयुष्यभराची साथ देण्याच्या वचनासोबत या गोष्टीसुद्धा नेहमी लक्षात ठेवा. तसेच प्रॉमिस डे हा प्रेमीयुगलुकांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस असल्याने काही गोष्टींचा विचार करुनच वचन आयुष्यभर पाळण्याचा प्रयत्न करा.