Pandharpur Wari 2019: संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांची पालखी आज पुणे शहरात; दगडूशेठ गणपती मंदिराला विशेष सजावट
Dagadusheth Halwai Ganapati Temple (Photo credits: Instagram)

आषाढी वारी 2019 ला सुरूवात झाली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी हून तर संत तुकाराम यांची पालखी देहू या त्यांच्या जन्मगावाहून पंढरीकडे प्रस्थान ठेवते. आज तुकोबा आणि ज्ञानोबा यांची पालखी पुण्यामध्ये विसाव्याला असेल. काल (26 जून) पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मंदिर परिसरातून पालखी पुढे सरकली. त्यावेळेस वारकर्‍यांचं स्वागत करण्यासाठी खास विठुरायाच्या आकृतीमध्ये फुलांची आकर्षक सजावट दगडूशेठ मंदिराच्या प्रवेशद्वारावर पहायला मिळाली. पहा माऊलींच्या पालखी 2019 चं संपूर्ण वेळापत्रक 

दगडूशेठला आकर्षक सजावट

यंदा ज्ञानेश्वर महाराजांचा 118 वा पालखी सोहळा आहे तो आज पुणे येथे पालखी विठोबा मंदिर भवानी पेठेत पूर्ण दिवस असेल. तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 334 वा पालखी सोहळा पुणे येथे नानापेठ निवडुंगा विठ्ठल मंदिरात पूर्ण दिवस असेल. पुण्यात पालखी असेपर्यंत वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. Mauli Palkhi 2019: आळंदी हून संत ज्ञानेश्वरांच्या पालखी प्रस्थानापूर्वी अश्वांची दगडूशेठ गणपतीला मानवंदना (Watch Video)

यंदा आषाढी एकादशीचा सोहळा 12 जुलै 2019 दिवशी आहे. देशापरदेशातील वारकरी या दिवशी विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात पोहचतात.