Mauli Palkhi 2019: आळंदी हून संत ज्ञानेश्वरांच्या पालखी प्रस्थानापूर्वी अश्वांची दगडूशेठ गणपतीला मानवंदना (Watch Video)
Palkhi (Photo Credits: You Tube)

आषाढी वारी 2019 (Ashadhi Wari)  साठी संत तुकाराम यांची पालखी आज (24 जून) आणि संत ज्ञानेश्वरांची पालखी (25 जून) दिवशी रवाना होणार आहे. या दरम्यान वारकरी समुदयामध्ये पालखी सोहळ्याची तयारी जोरदार सुरू आहे. माऊलींच्या पालखी प्रस्थान ठेवण्यापूर्वी अश्वांनी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे (Dagdusheth Ganpati) दर्शन घेतले. वारकर्‍यांनी गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर अश्वांनी आपली मानवंदना अर्पण केली. त्यानंतर उद्या आळंदीहून माऊलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे. Ashadhi Wari 2019: संत तुकारामांची पालखी आज करणार प्रस्थान; वारकर्‍यांना शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छापत्रं!

अश्वांची मानवंदना

25 जूनला आळंदीहून ज्ञानदेवांची पालखी प्रस्थान करणार आहे. यामध्ये यंदा लाखो वारकरी सहभागी होणार आहे. दुपारी अडीजच्या सुमारास संत तुकारामांच्या पालखीचे प्रस्थान होईल. यंदा तुकारामांच्या पादुका चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजन होणार आहे.